Sakshi Sunil Jadhav
हिवाळा सुरु झाला की बऱ्याच जणांना तळपायांना पडणाऱ्या भेगांच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकांना या भेगा वर्षभर त्रास देतात, पण थंड वातावरणात त्यांची तीव्रता वाढते. काहींच्या भेगा एवढ्या खोल जातात की चालताना दुखणे, चिरणे आणि अगदी रक्तसुद्धा येते.
बाजारात क्रॅक हिलसाठी अनेक महागडे क्रीम उपलब्ध असले तरी घरातील काही वस्तूंनी तयार केलेले हे घरगुती क्रॅक हिल क्रिम खूप प्रभावी ठरते. चला तर मग, जाणून घेऊया हे घरगुती उपाय आणि ते कसे वापरावे.
एका बाऊलमध्ये 2 चमचे मोहरीचे तेल घ्या. मोहरीचे तेल नसेल तर त्याऐवजी खोबरेल तेल वापरू शकता.
तेलामध्ये 1 चमचा ग्लिसरीन घाला. हे त्वचा मऊ ठेवण्यास मदत करेल.
एक चमचा व्हॅसलिन घातल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होईल. तसेच चालताना वेदना सुद्धा कमी होण्याची शक्यता असते.
मध्यम आकाराच्या मेणबत्तीचा 3 ते 4 से.मी.चा तुकडा या मिश्रणात टाका. हा सिक्रेट आणि व्हायरल झालेला उपाय आहे.
हे मिश्रण गॅसवर गरम करा. मेण वितळून सगळे साहित्य छान एकजीव होऊ द्या. त्यासाठी बाऊल थोडा जाड असूद्यात.
गॅस बंद करून मिश्रण थोडे कोमट झाल्यावर ते काचेच्या जारमध्ये भरून ठेवा.
रोज रात्री पाय धुवून हा जेलसारखा क्रिम लावा आणि सॉक्स घाला. काही दिवसांत टाचा बदलल्यासारख्या वाटतील.