Late night eating cancer risk saam tv
लाईफस्टाईल

Cancer risk: रात्री उशीरा जेवल्याने होऊ शकतो कॅन्सर? डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

Late night eating cancer risk: डॉक्टरांच्या संशोधनानुसार, रात्री उशीरा जेवण करणं ही केवळ पचनाशी संबंधित समस्या निर्माण करणारी सवय नाही तर दीर्घकाळात कॅन्सरचा धोका वाढवू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

आजकाल आपली लाईफस्टाईल पूर्णपणे बदलली आहे. नोकरीच्या वेळांमुळे रात्रीचं जेवण होण्यासही उशीर होतो. सतत रात्री उशीरा जेवल्यानंतर मग तुम्हाला त्याची सवय होते. आपण काय खातो इतकंच आपण कधी खातो हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही रात्री उशीरा जेवत असाल तर तुम्हाला गंभीर आरोग्याच्या समस्या होण्याचीही शक्यता असते. यामध्ये कॅन्सरचाही समावेश असतो असं अनेकांचं म्हणणं आहे.

जागरणच्या वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्रामच्या मॅक्स हॉस्पिटलमधील मेडिकल ऑन्कोलॉजीचे संचालक डॉ. नागेंद्र शर्मा म्हणाले की, रात्री उशिरा जेवल्याने थेट कॅन्सर होत नाही. परंतु ही सवय अप्रत्यक्षपणे कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढवू शकते.

शरीराचं सर्केडियन रिदम बिघडतं

आपल्या शरीरात सर्कॅडियन रिदम नावाचं एक बायोलॉजीकल क्लॉक असतं. याद्वारे आपले हार्मोन्स, चयापचय आणि पेशी दुरुस्तीचं काम सुरु असतं. ज्यावेळी आपण नियमितपणे रात्री उशिरा जेवतो तेव्हा ही सर्कॅडियन रिदम बिघडू लागचं. याचा संबंध लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोध आणि इन्फ्लामेशन यांच्याशी जोडला गेलाय. या तिन्ही घटकांचा ब्रेस्ट, कोलोरेक्टल आणि प्रोस्टेट कॅन्सरशी संबंध असल्याचं डॉक्टरांचं मत आहे.

झोपेच्या वेळेपूर्वी हेवी, हाय कॅलरीयुक्त जेवण जेवल्यास शरीरातील इन्सुलिन आणि मेलाटोनिनच्या पातळीवर परिणाम होतो.

  • मेलाटोनिनची कमतरता - झोपेसाठी जबाबदार असलेल्या मेलाटोनिनची पातळी कमी झाल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.

  • इन्सुलिनची पातळी वाढणं - रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढल्याने पेशींची असामान्य वाढ होऊ शकते. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोकाही वाढतो.

झोपेचा अभाव

रात्री उशिरा जेवण्याचा अजून एका दुष्परिणाम म्हणजे झोप न लागणं. ज्यावेळी तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही किंवा तुमच्या झोपेची गुणवत्ता खराब असते तेव्हा तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ लागते. अशावेळी रोगप्रतिकारक शक्ती कॅन्सरच्या पेशी ओळखण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी जबाबदार असते. मात्र अपुऱ्या झोपेमुळे रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होतो.

कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी काय करावं?

रात्री उशीरा जेवणं टाळणं हे कॅन्सरचा प्रतिबंधासाठी एक मोठं पाऊल असू शकतं.

  • वेळ- झोपण्यापूर्वी किमान २-३ तास ​​आधी जेवण करा.

  • नाश्ता टाळा - रात्री उशिरा नाश्ता खाण्याची सवय बदला.

  • जीवनशैली बदला - वेळ बदलणं पुरेसं नाही. यामध्ये संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणंही देखील आवश्यक आहे.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tandalachi Bhakri: तांदळाची भाकरी कडक होतेय? मऊसूत होण्यासाठी ही टीप करा फॉलो

Maharashtra Live News Update : खग्रास चंद्रग्रहणामुळे आज साडेतीन तास साईदर्शन राहणार बंद

Hypersonic Missile : इराणचा जोरदार पलटवार, शक्तिशाली हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा वापर, धडकी भरवणारा व्हिडिओ

konkan Tourism : शिमग्याला कोकणात गेलाय ना; मग 'ही' खास ठिकाणं तुमची वाट पाहत आहेत, पाऊल ठेवताच हिरव्यागार निसर्गात हरवून जाल

राज्यसभा निवडणुकीपूर्वी धमाका; 'हा' पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? दिल्लीत हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT