Strong Bones Secret Revealed Saam
लाईफस्टाईल

हाडं ठिसूळ झाली? उठता बसता कटकट आवाज येतो? ५ रूपयांचा 'हा' पदार्थ खा, स्ट्राँग हाडांचं सिक्रेट

Strong Bones Secret Revealed: फक्त दुग्धजन्य पदार्थात नाही, अनेक पदार्थात कॅल्शियम आढळते. चुनामध्येही कॅल्शियम असते. चुना हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे.

Bhagyashree Kamble

  • कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं ठिसूळ होतात.

  • दु्ग्धजन्य पदार्थ आवडत नाही?

  • पानावर चुना लावून खा, हाडं होतील मजबूत.

शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी कॅल्शियम आवश्यक. कॅल्शियम फक्त हाडं किंवा दातांसाठी आवश्यक नसून, इतर अनेक शारीरिक कार्यांमध्ये देखील मदत करते. कॅल्शियमच्या कमतरतेचे अनेक हानिकारक परिणाम आहेत. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं आणि दात कमकुवत होतात. स्नायू कमजोर होतात. अशक्तपणा निर्माण होतो. मज्जातंतूचे कार्य बिघडते. मुख्य म्हणजे हाडं ठिसूळ होतात.

कॅल्शियमसाठी आपण दुग्धजन्य पदार्थ खातो. काहींना दुग्धजन्य पदार्थ नाही आवडत. धकाधकीच्या जीवनात आपल्याला स्वत: कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. यामुळे कमी वयात आपल्याला रोगराईचा त्रास होतो. जर कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करायची असेल तर, एक पदार्थ खा. हाडं मजबूत होतील. शरीर योग्यरित्या कार्य करेल.

प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ.बिमल छाजेर यांनी वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, 'बऱ्याच जणांना असं वाटतं कॅल्शियम फक्त दुधात आढळते. पण असं नाही. अनेक पदार्थांमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळाल्यानं केवळ हाडं आणि दात मजबूत राहतात असं नाही. तर, वयानुसार ऑस्टियोपोरोसिस आणि हाडांच्या ठिसूळपणाचा धोका कमी होता'.

एका प्रौढ व्यक्तीच्या शरीराला सुमारे १००० ते १२०० मिलीग्रॅम कॅल्शियमची आवश्यकता असते. जी दुध, दही आणि चीजसारख्या दु्ग्धजन्य पदार्थांमधून मिळते. तसेच हिरव्या पालेभाज्यांमधूनही मिळते. कॅल्शियमसाठी आपण सोया, बदामही खाऊ शकता. या पदार्थांमधून कॅल्शियम मिळते. हाडे, दात, ह्रदय आणि नसा योग्यरित्या कार्य करतात.

डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, कॅल्शियमचा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे चुना. दुकानात आपल्याला विड्याच्या पानावर चुना लावून मिळतो. जर, आपल्याला पान आवडत नसेल तर, पाण्यात चुना मिसळून प्या. यामुळे शरीराची कॅल्शियमची गरज पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नव्या शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा? जाणून आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT