Health Tips
Health Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Health Tips : डोळ्यांच्या दृष्टीसाठी कोबी आहे फायदेशीर पण आरोग्यासाठी तितकीच घातक !

कोमल दामुद्रे

Health Tips : शरीराला पोषणाची गरज असते ती आपल्याला हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने मिळते भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आणि संयुगे असतात जे आपले संरक्षण करते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

विविध रोगांसाठी पालेभाज्या फार महत्त्वाच्या असतात त्यावेळेस ते औषधांसारखे काम करते. त्यातील एक भाजी कोबी. कोबी खाण्याचे अनेक फायदे आपल्याला होतात, दृष्टी, वर्ण आणि कर्करोगासाठी कोबी महत्त्वाचे काम करते.

पण कोबीचे योग्य प्रकारे सेवन केले नाही तर त्याचे नुकसानही होऊ शकते त्यामुळे कोबीचे सेवन करण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेणे आवश्यक आहे.

A. कोबीमध्ये आढळणारे पोषकतत्व

पोषक घटक आरोग्यासाठी (Health) फायदेशीर मानले जाते. यामध्ये अँटिऑक्साइड दाहक विरोधी गुणधर्म आहेत. कोबी मध्ये जीवनसत्वे ,खनिजे आणि फायटोन्यूट्रीएट्स मुबलक प्रमाणात असतात. तसेच कोबी मध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते आणि कॅलरीज कमी असतात.

B. कोबी खाण्याचे फायदे

1. पचन आणि बद्धकोष्ठता

कोभीमध्ये व्हिटॅमिन (Vitamins) सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी कोबीच्या रसाचे सेवन केले जाऊ शकते त्यामुळे सर्दी ताप आणि संसर्ग च्या समस्या कमी होतात. तसेच पोटाच्या समस्येसाठी कोबी फायदेशीर असते.कोबी मध्ये फायबर चे प्रमाण अधिक असते त्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात.

Cabbage

2. दृष्टीसाठी उपयोगी

ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन कोबी मध्ये आढळतात असे एका रिसर्च जनरल नुसार समोर आले आहे.हे दोन्ही घटक डोळ्यांसाठी (Eye) फायेशीर (Benefits) असतात त्यामुळे दृष्टी सुधारण्यासाठी तुम्ही कोबी चे सेवन करू शकता.

3. कर्करोगासाठी फायदेशीर

कर्करोगासाठी (Cancer) कोबी खाणे फायद्याचे असते हे कर्करोगाविरोधी केमो प्रतिबंधक क्रिया दर्शवते. कॅन्सरच्या गाठी टाळण्यासाठी कोबीचे सेवन केले जाऊ शकते. कोबीच्या सेवनाने कॅन्सरचा होणारा त्रास कमी केला जाऊ शकतो.

C. कोबीचे तोटे

  • कोबीचे जास्ती सेवन केल्याने थायरॉईड च्या रुग्णांना त्रास होऊ शकतो म्हणून थायरॉईड असलेल्या रुग्णांनी कोबीचे जास्त सेवन करू नये.

  • घशात एलर्जी सारख्या तक्रारी उद्भवण्यास कोबी हे त्याचे कारण ठरू शकते.

  • कोबी मुळे शरीरातील सामान्य ब्लड शुगर झाल्यावर ग्लुकोज लेव्हल कम होऊ शकतो.त्यामुळे कोबीचे सेवन हे मधुमेह रुग्णांसाठी लाभकारक आहे तेवढेच नुकसानदायी आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

iVOOMi Energy: एका चार्जमध्ये अख्खी मुंबई पालथी घालता येईल! जबरदस्त रेंजसह लॉन्च झाली JeetX ZE इलेक्ट्रिक स्कूटर

Numerology: 'या' तारखेला जन्मलेल्या लोकांकडून नका ठेवू निष्ठा आणि विश्वासाची अपेक्षा; काय म्हणतं अंकशास्त्र?

Apple IPad Air आणि IPad Pro भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

BCCI शी चर्चा! नको रे बाबा; कारवाईनंतर केकेआरचा गोलंदाज राणाची क्रिकेट बोर्डावर टीका

SCROLL FOR NEXT