Budh Gochar 2023 Saam tv
लाईफस्टाईल

Budh Gochar 2023 : बुध ग्रहाचे वृश्चिक राशीत संक्रमण! ५ राशींना ठरणार लकी तर ३ राशींवर येणार मोठं संकट

Budh Gochar Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या बदलत्या हालचालींना खूप महत्त्व दिले जाते. त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. २८ डिसेंबरला बुध ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रात बुधाला विशेष स्थान आहे.

कोमल दामुद्रे

Budh Gochar In Vrishchik Rashi :

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या बदलत्या हालचालींना खूप महत्त्व दिले जाते. त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. २८ डिसेंबरला बुध ग्रहाने वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रात बुधाला विशेष स्थान आहे.

बुध वृश्चिक राशीत प्रवेश करत असल्याने काही राशींना लाभ होईल. तर काही राशीच्या व्यक्तींनी काळजी घेणे आवश्यक आहे. कुंडलीत जर बुध असेल तर तो व्यक्तीला व्यापारी, बोलण्यात पारंगत आणि हुशार बनवतो. तसेच बुध ग्रहाच्या कमकुवतपणामुळे बोलण्याशी संबंधित समस्या, स्मरणशक्ती कमी होते. आर्थिकतेशी सामना करावा लागतो. जाणून घेऊया कोणत्या ५ राशींना बुध लकी ठरणार आहे ते.

1. मेष-

वैवाहिक (Marriage) सुखात वाढ होईल. कपड्यांवर खर्च करण्याची शक्यता अधिक आहे. संभाषणात निपुण व्हाल. कुटुंबातील (Family) वरिष्ठांकडून पैसे मिळतील. आरोग्याची काळजी घ्या.

2. वृषभ-

मन अस्वस्थ राहील. स्वत:वर नियंत्रण ठेवा. रागामुळे गोष्टी बिघडू शकतात. कुटुंबात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. मित्रांकडून सहकार्य लाभेल.

3. मिथुन

मन अस्वस्थ राहिल. स्वत:वर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अनावश्यक राग टाळा. आरोग्याची काळजी घ्याल. व्यवसायात (Business) अडथळे येऊ शकतात. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळतील.

4. कर्क

एखाद्या गोष्टीच्या बाबतीत चढ-उतार होईल. आत्मविश्वास ढासळेल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. अधिक मेहनत घ्यावी लागेल.

5. सिंह

आत्मविश्वासाने मनोबल वाढेल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. मुलांच्या आनंदात वाढ होईल. कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. कामामुळे धावपळ होईल.

6. कन्या

मन अस्वस्थ होऊ शकते. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. मुलांच्या आनंदात वाढ होईल. कुटुंबात धार्मिक कार्य घडू शकतात.

7. तूळ

बुध ग्रहाच्या संक्रमणामुळे आत्मविश्वास वाढणार आहे. मन अस्वस्थ होऊ शकते. कुटुंबाच्या आरोग्यावर काळजी घ्या. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

8. वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी हे संक्रमण स्थिर असू शकते. आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. मनही अस्वस्थ होऊ शकते. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रेमात अडचणी येतील.

9. धनु

आत्मविश्वासाची कमतरता जाणवेल. मनातील नकारात्मक विचार टाळा. धीर धरणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी बदल होण्याची शक्यता आहे.

10.मकर

आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मानसन्मान मिळेल. कामाच्या नवीन संधी मिळतील. वाहनसुख मिळेल.

11. कुंभ

मन अस्वस्थ राहिल. स्वत:वर नियंत्रण ठेवा. नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कार्यक्षेत्रात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी अडथळे येतील.

12. मीन

मन प्रसन्न राहिल. आत्मविश्वास वाढेल. संयम राखावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेपेची शिक्षा?

६६१ कोटा घोटाळा प्रकरण; निवृत्तीच्या ४ दिवसाआधी IAS अधिकारी फरार, मोबाईलही बंद

मुसळधार पावसाने उडवली धांदल; यवतमाळ-बुलढाणा-वाशिममध्ये पूरसदृश्य स्थिती

SCROLL FOR NEXT