Budh Gochar 2024 Saam tv
लाईफस्टाईल

Budh Gochar 2024 : बुध ग्रहाचे मकर राशीत संक्रमण! बुधादित्य राजयोग, या ६ राशी होतील मालामाल

Budhaditya Rajyog : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे संक्रमण होत असते. अशातच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आणि बुध एकाच राशीत आल्यामुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे.

कोमल दामुद्रे

Budh Gochar In Makar Rashi :

ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे संक्रमण होत असते. अशातच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य आणि बुध एकाच राशीत आल्यामुळे बुधादित्य राजयोग तयार होत आहे.

मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध मकर राशीत प्रवेश करेल. बुधाचे मकर राशीतील संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरणार आहे. फेब्रुवारीमध्ये या राशींची आर्थिक स्थिती सुधारेल. जाणून घेऊया कोणत्या राशींना फायदा होईल.

1. मेष

बुधादित्य राजयोगामुळे फेब्रुवारी महिन्यात यश (Success) मिळेल. नोकरीच्या नव्या संधी मिळतील. करिअरमध्ये (Career) प्रगती होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.

2. मिथुन

आर्थिक स्थिती वाढ होईल. व्यावासायिक लोकांची प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिक संबंधही घट्ट होतील. गुंतवणुकीतून (Investment) फायदा होईल. करिअरच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती राहिल. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा प्लान कराल.

3. सिंह

सिंह राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यात यश मिळेल. व्यावसायिक काम करणाऱ्यांना यश मिळेल. या काळात अधिक परिश्रम करावे लागेल. कुटुंबासह तीर्थ यात्रेला जाऊ शकता. कुटुंबात शुभ कार्यक्रम होतील.

4. कन्या

अडकलेला पैसा मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जावे लागेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर इतरांवर प्रभाव पाडू शकाल. सरकारी कामे पूर्ण होतील. पैसे कमावण्याची चांगली संधी मिळेल.

5. तुळ

पैसे कमावण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. व्यवसायात चांगली वाढ झाल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल.

6. कुंभ

व्यवसायात चांगला नफा मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी चांगली संधी आहे. प्रयत्नांना यश मिळेल. या काळात अधिक पैसे कमावाल. कर्जातून लवकरच सुटका होईल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT