BSNL Internet Data New Plan Saam Tv
लाईफस्टाईल

३६५ दिवसांची वैधता आणि २GB दिवसाच्या डेटासह स्वस्त बीएसएनएल प्लॅन ! किंमत जाणून घ्या

हा प्लॅन तुम्हाला पूर्ण वर्षासाठी म्हणजेच ३६५ दिवसांसाठी लाभ देतो आणि त्याची किंमत इतर कंपन्यांच्या दीर्घकालीन योजनांपेक्षा खूपच कमी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : सरकारी दूरसंचार कंपनी म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) चे प्लॅन इतर सर्व खाजगी कंपनीच्या तुलनेने स्वस्त आहेत. बीएसएनएलचे प्लॅन वेळोवेळी अपडेट केले जातात. अलीकडे कंपनीने काही नवीन प्लॅन देखील आणले आहेत. पण जेव्हा दीर्घ वैधतेचा विचार केला जातो, तेव्हा बीएसएनएलच्या योजना इतर दूरसंचार कंपन्यांना मागे टाकतात. आज आम्‍ही तुम्‍हाला कंपनीच्‍या अशाच एका प्‍लॅनबद्दल सांगणार आहोत. जिच्‍या इतर कोणत्याही टेलीकॉम कंपनीसोबत तोड नाही. हा प्लॅन तुम्हाला पूर्ण वर्षासाठी म्हणजेच ३६५ दिवसांसाठी लाभ देतो आणि त्याची किंमत इतर कंपन्यांच्या दीर्घकालीन योजनांपेक्षा खूपच कमी आहे.

बीएसएनएल १४९८ प्लान : बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी १४९८ रुपयांचा प्‍लॅन घेऊन आले आहेत. या बीएसएनएलच्या प्रीपेड प्लानची किंमत १५०० रुपयांपेक्षा पण कमी आहे. या प्‍लॅनमध्ये ते दीर्घ वैधतेसोबत अनेक फायदे आहेत. भारत संचार निगम लिमिटिडचा हा प्‍लॅन दररोज २GB हायस्पीड इंटरनेट डेटा देत आहे. म्हणजेच ग्राहक पूर्ण ३६५ दिवस हाय स्पीड इंटरनेटचा वापर करू शकतो. एकूण डेटाबद्दल बोलायचे झाल्यास, प्लॅन तुम्हाला एकूण ७३०GBहाय स्पीड डेटा देतो. या प्लॅनवर रिचार्ज केल्यावर, तुम्हाला पूर्ण वर्षाची वैधता मिळते. पण हे फक्त डेटा व्हाउचर आहे आणि त्यात तुम्हाला कॉलिंगची सुविधा मिळत नाही.

३६५ दिवसांचा इंटरनेट प्लॅन हा त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना जास्त कॉलिंगची गरज भासत नाही. परंतु इंटरनेट वर्षभारासाठी पाहिजे असत. या प्लॅनमध्ये दिवसाचा २GB चा डेटा संपल्यावर इंटरनेटचा स्पीड ४०kbps राहतो. या प्लॅनच्या अधिक माहितीसाठी बीएसएनएलच्या ऑफिशिअल वेबसाईटवर भेट देऊ शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News : दिवाळीनिमित्त परिवार बाहेरगावी; बांधकाम व्यवसायिकाच्या घरी २२ लाखांची चोरी

US Election : मतदानाआधी शेवटच्या रॅलीत डोनाल्ड ट्रम्प नाचले; माजी राष्ट्राध्यक्षांची तुलना, VIDEO

Maharashtra News Live Updates: निवडणूक आयोगाकडे मिलिंद देवरा यांच्या विरोधात तक्रार

VIDEO : 'फेसबुक लाईव्ह करून राज्य चालत नाही', मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

Samantha Fitness Secret: समंथाने सांगितला फिटनेसचा राज, वजन वाढू नये म्हणून खाते 'हे' पदार्थ

SCROLL FOR NEXT