वरण-भाताशिवाय आपल्या जेवणाची चव काही पूर्ण होत नाही. ताटाची शान वाढवण्यासाठी अनेक भारतीय घरात नियमितपणे वरण भात आजही बनवला जातो. गरमागरम वरण भात आणि त्यावर साजूक तूप पदार्थाची चव वाढवतात.
भाताचे अनेक प्रकार आहेत. साधा भात, जिरा भात, मसाले भात, फोडणीचा भात, पुलाव, बिर्याणी असे एक नी अनेक प्रकारच्या भाताची चव आपल्याला चाखायला मिळते. परंतु, हल्ली बाजारात पांढरा, ब्रॉउन, काळा आणि लाल तांदूळचे देखील प्रकार पाहायला मिळतात. हे तांदूळ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर (Benefits) जरी असले तरी वजन कमी (weight Loss) करण्यासाठी कोणता तांदूळ बेस्ट आहे हे जाणून घेऊया.
1. पांढऱ्या तांदळाचे फायदे
पांढरा तांदूळ (Rice) शरीराला ऊर्जा प्रदान करतो. तसेच यामध्ये अधिक पोषक आणि कर्बोदके असतात. याशिवाय यामध्ये फायबर आणि फॅटचे प्रमाण देखील असते. ज्या लोकांना शरीरात अधिक ऊर्जा हवी असते. त्या लोकांसाठी पांढरा रंगाचा तांदूळ अधिक चांगला मानला जातो. याचे सेवन क्रीडापटू किंवा व्यायाम करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतो.
2. तपकिरी तांदूळ
हा तांदूळ फायबर, प्रथिने आणि चरबीने समृद्ध आहे. जर तुम्हालाही पचनाची समस्या असेल तर याचे सेवन करणे टाळावे. यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्ससह रक्तातील साखरला नियंत्रणात ठेवण्यास अधिक मदत करते.
3. लाल तांदूळ
लाल रंगाचा तांदूळ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानला जातो. हा राईस अधिक महाग असला तरी, सहसा मिळत नाही. यामध्ये असणारे अँटिऑक्सिंडेंट रक्तदाब कमी करतात. लोह आणि जस्तने परिपूर्ण असलेला हा तांदूळ वजन कमी करण्यास मदत करतो.
4. काळा तांदूळ
या तांदळाला जांभळा तांदूळ म्हणून ओळखला जातो. याच्या रंगामुळे हा अधिक पौष्टिक मानला जातो. या तांदळचा भात खाल्ल्याने तणाव आणि सततच्या होणाऱ्या जळजळीपासून आराम मिळतो. व्हिटॅमिन ई आणि लोहाने युक्त असलेला हा तांदूळ हृदयाचे आणि यकृताचे आरोग्य राखण्यास मदत करते. हा तांदूळ फायबरचा मुबलक स्तोत्र आहे.
आहाराची गरज आणि आरोग्याच्या समस्या घेऊन आपण पांढरा, ब्राउन, लाल किंवा काळ्या तांदळाची निवड करु शकतो.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.