Lakshmi Pujan 2025 saam tv
लाईफस्टाईल

Lakshmi Pujan 2025: लक्ष्मीपूजनाला सोने-चांदीऐवजी या ४ वस्तू घरी आणा; वर्षभर पैशांची कमी जाणवणार नाही

Diwali Tips: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीऐवजी या ४ शुभ वस्तू घरात आणा. स्वस्त पण वास्तुशास्त्रानुसार शुभ अशा या वस्तूंमुळे वर्षभर धनप्राप्ती आणि समृद्धी होते.

Sakshi Sunil Jadhav

लक्ष्मीपूजनाला संपत्तीचं आगमन आणि देवी लक्ष्मीच्या पूजनाचा शुभ दिवस मानला जातो या दिवशी पारंपरिकरित्या सोने किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. मात्र आजच्या काळात सोन्याचे दर आकाशाला भिडलेले असल्याने प्रत्येकालाच सोने घेणं शक्य होत नाही. अशावेळी काही अशा वस्तू आहेत ज्या स्वस्त असूनही वास्तुशास्त्र आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानल्या जातात. या वस्तू घरात आणल्याने वर्षभर धनप्राप्ती आणि समृद्धी टिकून राहते.

१. कुबेर यंत्र

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेर यंत्र घरात किंवा दुकानात ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. हे यंत्र धन आणि समृद्धीचे प्रतीक आहे. ते घरातील तिजोरी, गल्ला किंवा देवघरात ठेवल्यास पैशाचा ओघ कायम राहतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. या यंत्रामुळे वर्षभर लक्ष्मी-कुबेरांची कृपा लाभते असे मानले जाते.

२. झाडू

भारतीय परंपरेनुसार झाडू ही देवी लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते. म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ असते. यामुळे घरातील दरिद्रता दूर होते, अडचणी नाहीशा होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते. काही ठिकाणी या दिवशी जुन्या झाडूची जागी नवीन झाडू आणण्याची प्रथा आहे, जी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास उपयुक्त मानली जाते.

३. कोथिंबीर

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोथिंबीरचे बी घरात आणणं हे आर्थिक दृष्ट्या शुभ मानलं जातं. लक्ष्मीपूजनावेळी या बियांचा पूजन थाळीत समावेश करून नंतर ते तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवले जातात. या कृतीमुळे वर्षभर धनवृद्धी होते आणि घरात बरकत टिकून राहते, असा विश्वास आहे.

४. तांब्याची भांडी

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तांबे किंवा कांस्य धातूच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. तांब्याचे भांडे, पूजा साहित्य किंवा सजावटी वस्तू घरात आणल्याने आरोग्य सुधारते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तांब्याला शुद्धतेचे प्रतीक मानले जाते आणि त्यामुळे ते घरात स्थैर्य आणि समृद्धी आणते असे म्हटले जाते. लक्ष्मीपूजन हा फक्त सोन्या-चांदीपुरता मर्यादित सण नाही तर तो संपन्नतेच्या शुभारंभाचा दिवस आहे. त्यामुळे या वेळी या स्वस्त पण शुभ वस्तू घरात आणा आणि देवी लक्ष्मीचे स्वागत सकारात्मक ऊर्जेसह करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाशिम अपघात; दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, एकजण ठार

Blood Sugar Level: अचानक ब्लड शुगर लेव्हल कमी झाली, कारण काय? आरोग्यावर काय होतो परिणाम

Tuesday Horoscope: नोकरी व्यवसायात काम करण्याऱ्यांवर लक्ष्मीची कृपा राहणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Mumbai News : मुंबई महापालिकेत सर्वात मोठा बदली घोटाळा; नव्या वादाचा चेंडू थेट CM फडणवीसांच्या कोर्टात

येमेनजवळील समुद्रात मोठी दुर्घटना; जहाजावरील LPG टँकरला भीषण आग, जहाजावर होते २३ भारतीय खलाशी

SCROLL FOR NEXT