Sakshi Sunil Jadhav
शुभ ग्रह पाठीशी आहेत आणि म्हणूनच अडचणीतून आपण बाहेर येणार अशी तीव्र भावना आपली असणार आहे. दिवाळी प्रसन्न अशी सकाळ घेऊन येणारी ठरेल.
धन आराधनेसाठी दीपोत्सव हा तुम्हाला चांगला ठरणार आहे. आपल्या जवळच्या लोकांबरोबर, प्रियजनांबरोबर, प्रियकराबरोबर - उत्साहात, मौजमजेत दीपावली जाईल.
देवाकडे काही मागण्याची वेळच येणार नाही. काय मागू आणि काय करू अशा संमिश्र भावना असतील. वडीलोपार्जित प्रॉपर्टीचे व्यवहार होतील. तरुणांचे नैराश्य जाईल.
भावनांचा उद्रेक टाळून पुढे जावे लागेल. आपल्या महत्त्वाच्या वस्तू सांभाळणे आज गरजेचे आहे. विद्युत उपकरणांपासून सावध रहा. पण दिवाळी सुंदर जाईल.
"दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती" असा दिवस आहे. पूर्व संचितामधून लाभ मिळतील. लॉटरी, गुंतवणूक, धनाची आवक जावक यासाठी दिवाळी उत्तम अशी वार्तांकन घेऊन आलेली आहे.
ही दीपावली आपल्याला चांगलीच दैवी प्रचिती घेऊन येणारी आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. नोकरीचे मार्ग पक्के होतील. आनंददायी क्षण उपभोगाल.
एखादी दिवत्वाची सुंदर अशी प्रचिती आपल्याला येईल. संत समागम घडून येईल. दैवी स्पंदन देणारी ही दिवाळी आहे. सरकारी माध्यम अनुकूल ठरतील.
पाहुण्यांचे आगत स्वागत, खरेदी यांना विशेष उठाव देणारी यंदाची दिवाळी आहे. विक्रमी आणि घसघशीत अर्थ द्वार खुले होईल. व्यवसायामध्ये मोठी वसुली होईल.
व्यवसायामध्ये आपले उपक्रम गाजवून जाल. नव्या नव्या संधी मिळतील. दीपावली पर्व आपल्यासाठी उत्तम संधी घेऊन येणार आहे.
आपल्या राशीला अनेक दिवस ताटकळत असलेल्या सुवार्ता कानावर येतील. करमणुकीमधून आनंद मिळवाल. मोठ्या पॅकेजचा लाभ होईल.
नव्या गाठीभेटी होतील. आपल्या लोकांशी छानशी भावस्पदने निर्माण होतील. अडचणी असल्या आर्थिक संकट जरी आले तरी त्यातून मार्गक्रमण कराल.
जीवन सार्थकी लागली आहे अशी भावना येईल. प्रियजनांच्या सहवासामध्ये रम्यता जाणवेल. संसारामधील शुभ घटनांचा कालावधी जणू हा आहे अशी भावना होईल.