Share Market: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; Sensex 300 अंकांनी वधारला Saam Tv
लाईफस्टाईल

Share Market: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; Sensex 300 अंकांनी वधारला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Share Market: शेअर मार्केटमध्ये आज सकाळी सकारात्मक सुरुवात झाली. प्री- ओपनिंगमध्ये बाजारामध्ये जोरदार सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय (International) पातळीवर शेअर बाजार (Share Market) वधारला असून सकारात्मक संकेत सध्या मिळत आहे. आज शेअर ,मार्केटमध्ये सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स (Sensex) ३६९ अंकांनी वधारल्यावर ५३७९३ अंकावर सुरू झाला होता. निफ्टीमध्ये ६५ अंकांची थोडीशी तेजी दिसून आली. यानंतर १६०७८ वर ट्रेडिंग सुरुवात केली. सकाळी मार्केटमध्ये शेअर मार्केट सुरू होताच सेन्सेक्समध्ये काहीशी घसरण झाली होती. (Break stock market decline Sensex up 300 points)

हे देखील पहा-

यानंतर बाजार सावरला आणि वधारण्यास सुरुवात झाली होती. निफ्टीमध्ये ५० स्टॉक्सपैकी १५ स्टॉक्समध्ये घसरण दिसत आहे. तर, ३५ शेअर्स वधारले आहेत. आज व्यवहार सुरू झाला तेव्हा सुरुवातीच्या काही मिनिटांतच १५, ९९० च्या अंकावर गेला होता. बँक निफ्टीमध्ये (Nifty) आज ३३,१०६ च्या पातळीवर व्यवहार चालू होता. आज सकाळी, ९.४५ वाजण्याच्या सुमारास ४९२ अंकांनी सेन्सेक्स वधारला होता. तर, निफ्टी १२८ अंकांनी वधारला होता. आज, बँक निफ्टी, मेटल आणि खासगी बँकांचे (Private banks) क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्र सर्व शेअर वधारले आहेत.

मीडिया सेक्टरमधील शेअर्स २.४ टक्क्यांनी वधारले आहेत. हेल्थकेअर इंडेक्समध्ये १.४२ टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. तर, आयटी क्षेत्रामध्ये देखील १.३५ टक्क्यांनी तर फार्मा शेअर १.३० टक्क्यांनी वधारले आहेत. शिवाय, ऑटो, कन्झ्युमर ड्युरेबल्स आदी शेअर वधारले आहेत. एशियन पेंट्स १.१४ टक्के, कोटक महिंद्रा बँक आणि जेएसडब्ल्यू स्टील ०.८० टक्क्यांनी घसरले आहे. पॉवरग्रीड देखील ०.८० टक्क्यांनी घसरले आहे आणि श्री सिमेंट ०.७३ टक्क्यांनी घसरत आहे. या दरम्यान, सोमवारी शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स ५८१.३४ अंकांनी तर निफ्टीही १५०.३० अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये १.१० टक्क्यांची, तर निफ्टीमध्ये ०.९५ टक्क्यांची वाढ झाली असल्याची दिसून आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत युट्यूब चॅनेल हॅक !

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

SCROLL FOR NEXT