कोल्हापूर: महिला दिनी (women's day) एका महिलेची पतीने निर्घृणपणे हत्या (killed) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करवीर तालुक्यातील (Kolhapur) एका चौकात ही धक्कादायक घटना घडली आहे. या चौकामध्ये पत्नीच्या डोक्यामध्ये लाकडी दांडक्याने प्रहार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादामधून पतीने डोक्यामध्ये लाकडी ओंडका घालून पत्नीचा खून केला आहे. (husband killed wife due to family dispute in kolhapur)
हे देखील पहा-
महिला दिना दिवशीच ही दुर्दैवी घटना करवीर तालुक्यातील पाचगाव येथे घडली आहे. अरुणा पवार असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती विजय पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पत्नीची हत्या केल्यावर २ तास तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या मृत्यूदेहबरोबर बसून होता. नंतर त्याने गल्लीमध्ये येऊन पत्नीचा खून केल्याचे सांगितले आहे. महिला दिना दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दाम्पत्य कर्नाटकमधील असल्याचे समजलं आहे. हे दाम्पत्य कोल्हापुरातील पाचगाव येथे एका भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते. आरोपी हा एक कामगार आहे. गेल्या काही दिवसांपासून पती आणि पत्नी यांच्यामध्ये वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा वाद इतका विकोपाला गेला आणि त्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने पत्नीवर लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार केला आहे. या हल्ल्यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.