brazil nuts google
लाईफस्टाईल

हिवाळ्यात ब्राझील नट्सचा आहारात समावेश केल्यास, थायरॉईड नियंत्रित राहण्यास होईल मदत...

आहारात नट आणि बियांचा समावेश करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. विशेषत: हिवाळ्यात त्यांचे सेवन केल्याने शरीराला ऊब मिळते.

Saam Tv

आहारात नट आणि बियांचा समावेश करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. विशेषत: हिवाळ्यात त्यांचे सेवन केल्याने शरीराला ऊब मिळते. त्याचप्रमाणे ब्राझील नट देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ब्राझील नट हे प्रोटीनचे पॉवर हाऊस मानले जाते. त्यामध्ये सेलेनियमची चांगली मात्रा देखील आढळते जे थायरॉईड रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. यासोबतच हे हृदय आणि मेंदूसाठीही फायदेशीर मानले जाते. म्हणून दिवसातून १ ते २ ब्रेझेल नट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ब्राझील नट्स खाण्याचे फायदे जाणून घेऊया.

१.गंभीर रोगांचा कमी धोका

ब्राझील नट्समध्ये सेलेनियमची चांगली मात्रा आढळते. सेलेनियम एक अँटिऑक्सिडेंट खनिज आहे जे शरीरातील पेशींना नुकसान होण्यापासून वाचवते आणि हृदयविकाराचा झटका, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांचा धोका देखील कमी करते.

२.थायरॉइड संतुलित ठेवते

सेलेनियमचे कार्य थायरॉईड ग्रंथीचे आरोग्य राखणे आहे. ब्राझील नट्समध्ये सेलेनियमचे उच्च प्रमाण थायरॉईड संतुलित ठेवते आणि थायरॉईड संबंधित समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

३.वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करते

ब्राझील नट्समध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात जे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि शरीरातील पेशींना संरक्षण मिळते.

४. हृदयाची काळजी घेते

ब्राझील नट्समध्ये ओमेगा-३ आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याच्या सेवनाने हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

५.पचन सुधारणे

ब्राझील नट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे पचनसंस्था सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते. आतडे स्वच्छ करण्यासोबतच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासही मदत होते.

६. वजन नियंत्रणात ठेवते

ब्राझील नट्समध्ये प्रथिने आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते, ज्यामुळे पोट जास्त काळ भरलेले राहण्यास मदत होते. हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कारण ते भूक नियंत्रित करण्यास मदत करते.

७.त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर

ब्राझील नट्समध्ये झिंक आणि सेलेनियम आढळतात, जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. ते त्वचेला आर्द्रता प्रदान करण्यास, सुरकुत्या कमी करण्यास आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited by - अर्चना चव्हाण

Virat Kohli: व‍िराट कोहलीचा चमत्कारिक षटकार; अख्खा क्रिकेट करिअरमध्ये दुसऱ्यांदा घडलं असं|Video Viral

Maharashtra Live News Update: कांदिवलीत एएनसीची मोठी कारवाई, ५० लाखांचे ड्रग्स जप्त

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक; १२ माओवादी ठार, ३ जवान शहीद

झेडपीचा धुरळा दोन टप्प्यांत, झेडपी की महापालिका, आधी कोणती निवडणूक?

Methi Bhaji Benefits: थंडीत खा मेथीची भाजी, वजन होईल कमी अन् ब्लड शुगर राहील नियंत्रणात

SCROLL FOR NEXT