Can Humans Hear After Death saam tv
लाईफस्टाईल

Brain activity after death: मृत्यूनंतरही आजूबाजूचा आवाज व्यक्ती ऐकू शकते? नव्या संशोधनातून धक्कादायक बाब समोर

Can Humans Hear After Death: नवीन वैज्ञानिक संशोधनानुसार हृदयाचे ठोके थांबल्यानंतरही मेंदू काही काळ एक्टिव्ह राहू शकतो. कार्डियाक अरेस्ट रुग्णांच्या अनुभवांमुळे मृत्यू ही क्षणिक घटना नसून एक प्रक्रिया असल्याचा दावा केला जातोय.

Surabhi Jayashree Jagdish

मृत्यू हा या शब्द जितका लहान आहे जितकाच तो रहस्यमयी मानला जातो. शतकानुशतकं व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय होतं हे शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. नुकत्याच झालेल्या एका नव्या वैज्ञानिक संशोधनाने हे गूढ आणखीनच रंजक झालं आहे. या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, हृदयाचे ठोके थांबल्यानंतरही मानवी मेंदू काही काळ एक्टिव्ह राहू शकतो आणि व्यक्ती त्याच्या सभोवतालचे आवाज ऐकू शकते.

संशोधनात काय झाला खुलासा?

न्यूयॉर्क विद्यापीठातील क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट डॉ. सॅम पर्निया आणि त्यांच्या टीमने हा दावा केला आहे. हा स्टडी वैद्यकीय जर्नल रिससिटेशनमध्ये पब्लिश करण्यात आला आहे. या संशोधनात हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. हृदय बंद झाल्यानंतरही मेंदू लगेच बंद होत नाही.

यामध्ये काही रुग्णांनी सांगितलं की, सीपीआरनंतर ते त्यांच्या सभोवतालच्या गोष्टी, डॉक्टरांचे आवाज आणि उपकरणांचे आवाज ऐकू शकतात. ईईजी मॉनिटरिंगमध्ये असं दिसून आलंय की, काही प्रकरणांमध्ये मेंदूची क्रिया काही मिनिटं सुरु राहते.

डॉ.पर्निया यांच्या मते, मृत्यू ही क्षणिक घटना नसून एक प्रक्रिया आहे. म्हणजे ज्यावेळी हृदय थांबतं तेव्हा शरीराचे इतर अवयव हळूहळू काम करणं थांबवतात.

मृत्यूची नवी व्याख्या?

आतापर्यंत अशी एक सामान्य समजूत होती की, हृदयाचे ठोके थांबल्यानंतर व्यक्तीची चेतना संपुष्टात येते. परंतु या संशोधनात असं दिसून आलंय की, हृदय बंद होणं आणि पेशींचा कायमचा मृत्यू हे वेगवेगळे टप्पे आहेत.

काही रुग्णांनी सांगितलं की, त्यांनी डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूची घोषणा ऐकली. जरी सर्व रुग्णांना हा अनुभव आला नसला तरी, बऱ्याच प्रकरणांमध्ये शास्त्रज्ञांना या विषयाबद्दल अधिक सखोल विचार करण्यास भाग पाडलंय.

हा स्टडी मनात थोडी भीती निर्माण करू शकतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मेंदू काही काळ एक्टिव्ह राहतो हे सिद्ध झाल्यास डॉक्टरांना रूग्णांशी अधिक संवेदनशीलतेने वागण्याची आवश्यकता भासू शकतं.

जरी हे संशोधन खूप महत्वाचं असलं तरी शास्त्रज्ञांना असं वाटतं की, याबाबत अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे. सर्व केसेसमध्ये एकच अनुभव आढळला नाही आणि मेंदूची क्रिया किती काळ टिकते हेदेखील पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. मृत्यू हे आजही एक गूढ आहे. परंतु विज्ञान याचा काही प्रमाणात उलगडा करतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली घोषणा

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT