Brain Hemorrhage  saam tv
लाईफस्टाईल

Brain Hemorrhage : वयाच्या 35 व्या वर्षी ब्रेन हॅमरेज! तरुणांनो, BP कडे दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली धोक्याची कारणे

High Blood Pressure : वयाच्या 35 व्या वर्षी तरुणाला ब्रेन हॅमरेज झाल्याची घटना समोर आली आहे. नियमित व्यायाम करूनही बीपी नियंत्रणात नसल्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.

Sakshi Sunil Jadhav

सध्या थंडीची चाहूल लागायला सुरूवात झाली आहे. थंडी म्हटलं की, आळस हा येतोच. सकाळी उठायला कंटाळा येतोच. पण सध्याच्या तरुणांच्या झोपेच्या वेळाच वेगळ्या आहेत. सतत मोबाईल स्क्रोलिंग सुरू असतं, त्यामुळे वेळेवर झोप येत नाही. मुळात मोबाईल शिवाय झोपच येत नाही. त्याचा परिणाम मुलांच्या लाइफस्टाइलवर आणि दिवसाच्या एकूण क्रियांवर होतो. पण काही तरूण जीम करून, योग्य आहार घेऊन आणि योग्य लाइफस्टाइल फॉलो करूनही गंभीर समस्यांना सामोरे जातात. यामध्ये त्यांना हाय ब्लड प्रेशर, डोळ्यांचे आजार, मानसिक तणाव अशा गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यातली हाय ब्लड प्रेशरची समस्या तरूणांमध्ये दिवसेंदिवस वाढलेली पाहायला मिळत आहे.

हैदराबादमधील डॉक्टर सुधीर कुमार यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका घटनेमुळे हा गंभीर विषय परत चर्चेत आलाय. फक्त ३५ वर्षांच्या एका आयटी क्षेत्रातल्या तरुणाला ब्रेन हॅमरेज झाल्याची घटना समोर आली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण तरुण हा आयटी प्रोफेशनल होता. तो रोज जिमला जायचा, व्यायाम करायचा आणि हेल्दी फूड आहारात घ्यायचा. त्याचं वजनही सामान्य होतं. पण रोजच्या चेकअपदरम्यान त्याचा ब्लड प्रेशर जास्त असल्याचं समजलं. मग डॉक्टरांनी त्याला ब्लड प्रेशरची औषधं सुरू करायला सांगितली. पण व्यायाम आणि योग्य आहारामुळे बीपी नियंत्रणात येईल, असा त्याला विश्वास होता. त्यामुळे त्याने औषधं घ्यायला नकार दिला. मग सहा महिन्यांनंतर अचानक त्याला तीव्र डोकेदुखी, उलट्या आणि शुद्ध हरपण्याचा त्रास झाला. रुग्णालयात तपासणी केली असता त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान झाले. त्याची तब्बेत खूप गंभीर होती आणि लगेचच उपचार करावे लागले.

तरुणांमध्ये बीपी वाढण्याची कारणे कोणती?

  • सतत छोट्या छोट्या गोष्टीचे टेन्शन आणि अपूर्ण झोप

  • जेवणातलं मिठाचं प्रमाण जास्त असणं

  • व्यायाम न करणं आणि लठ्ठपणा

  • तंबाखू आणि मद्यपान करणं

  • अन् हेल्दी लाइफस्टाइल आणि कौटुंबिक इतिहास

बीपी वाढल्याची लक्षणे कोणती?

हाय ब्लड प्रेशरमध्ये बऱ्याचदा कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. मात्र, काही लोकांना पुढील त्रास जाणवू शकतात.

  • सतत डोकंदुखी

  • विनाकारण थकवा जाणवणं

  • छातीत जडपणा वाटणं

  • अचानक धाप लागणं

  • सतत नाकातून रक्त येणं

  • ही लक्षणे फक्त बीपीमुळेच होतात असं नाही. त्यामुळे ब्लड प्रेशर मोजून चेकअप करणं महत्त्वाचं आहे.

डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चक्रीवादळाचा मार्ग बदलला; 14 राज्यांमध्ये कोसळणार धो-धो, 72 हजार नागरिकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी जाहीर

एकनाथ शिंदे हे संपूर्ण शिवसेना पक्ष होऊ शकत नाही; सुप्रीम कोर्टात खळबळजनक सुनावणी| VIDEO

DIY Floor Cleaning Tool: वाकून फरशी पुसताना कंबर दुखतेय? मग वापरा हा २ मिनिटांत तयार होणारा मॉप, उभ्यानेच होईल सफाई

Panjab Election : विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस धक्का, कंबोज यांचा भाजपात प्रवेश

Maharashtra News Live Update: आदानीच्या वीज प्रकल्पाचे काम चालूच

SCROLL FOR NEXT