Surabhi Jayashree Jagdish
आजकाल सर्दी-खोकल्याप्रमाणेच लोकांना अनेक मोठ्या आजारांनीही ग्रासायला सुरुवात केली आहे.
बिघडलेल्या जीवनशैलीमुळे ब्रेन हॅमरेजसारखा धोकादायक आजार होणंही आता सामान्य गोष्ट झाली आहे.
ब्रेन हॅमरेज कोणत्याही वयातील व्यक्तीला कधीही होऊ शकतो. मात्र रात्री ब्रेन हॅमरेज होण्याचा धोका आणखी वाढतो.
रात्री, विशेषतः झोपेत असताना ब्रेन हॅमरेज होण्याची अनेक कारणे असू शकतात.
त्या वेळी रक्तदाब कमी होतो, ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर अधिक ताण येतो आणि हॅमरेज होऊ शकतो.
रात्री शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, जे अचानक रक्तदाब वाढवतात आणि त्यामुळे हॅमरेज होऊ शकतो.
अनेक लोकांमध्ये रात्री झोपेत रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, ज्यामुळे हॅमरेज होण्याची शक्यता वाढते.
अशा परिस्थितीत तीव्र डोकेदुखी, उलट्या होणे, मानेत कडकपणा जाणवणे यांसारखी कोणतीही लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करावी.