Changes in body before brain tumor saam tv
लाईफस्टाईल

Early signs of brain cancer: सततची डोकेदुखी होत असेल तर असू शकतो ब्रेन कॅन्सर; मेंदू देत असलेले संकेत ओळखा

Brain cancer symptoms continuous headache: डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे, जी तणाव, थकवा किंवा डिहायड्रेशनमुळे होऊ शकते. परंतु काही वेळा ही डोकेदुखी शरीरातील एका गंभीर समस्येचा संकेत असू शकते

Surabhi Jayashree Jagdish

आपल्यापैकी सर्वांना कधी ना कधी डोकेदुखीचा त्रास झालेला असेलच. बहुतांश वेळा आपण याचं कारण ताण, थकवा, झोपेची कमतरता किंवा शरीरातील पाण्याची कमी मानतो. अशा प्रकारच्या डोकेदुखी काही तासांत बरीही होते. पण प्रत्येक वेळी डोकेदुखीला दुर्लक्ष करणं योग्य नाही. याचं कारण म्हणजे काही डोकेदुखी गंभीर आजारांचे संकेतही असू शकतात.

ब्रेन कॅन्सरची सुरुवातीची ओळख का कठीण असते?

ब्रेन कॅन्सरची सुरुवात सामान्य डोकेदुखीसारखीच वाटते. त्यामुळे अनेकदा लोक याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. पण यामध्ये खरा फरक दिसतो दुखण्याच्या पॅटर्नमध्ये, तीव्रतेमध्ये आणि त्यासोबत दिसणाऱ्या इतर लक्षणांमध्ये.

सतत किंवा वाढती डोकेदुखी

सामान्य डोकेदुखी आराम केल्यानंतर आणि औषधांनी कमी होते. मात्र जर डोकेदुखी वारंवार होत असेल आणि ती वेळोवेळी तीव्र होत असेल तर हे धोक्याचे लक्षण असू शकतं. अशा प्रकारच्या दुखण्यात मळमळ, उलटी यांसारखी लक्षणं दिसू शकतात. यावेळी औषधांनीही आराम मिळत नाही.

दृष्टीवर परिणाम

जर ब्रेन ट्यूमर ऑप्टिक नर्व किंवा दृष्टी प्रक्रिया करणाऱ्या भागावर दबाव टाकत असेल तर व्यक्तीच्या दृष्टीवर परिणाम होतो. धुसरं दिसणं, डबल व्हिजन किंवा अचानक दृष्टी अस्पष्ट होणं ही लक्षणं असू शकतात. हे बदल हळूहळू होतात आणि अनेकदा लोक याकडे थकवा म्हणून दुर्लक्ष करतात.

मानसिक क्षमता आणि वर्तनावर परिणाम

ब्रेन कॅन्सरचा परिणाम केवळ शरीरावरच नाही, तर विचारशक्ती, निर्णय घेण्याची क्षमता आणि भावनिक संतुलनावरही होतो. जर ट्यूमर फ्रंटल लोब किंवा इतर भागात असेल तर चिडचिड, नैराश्य, चिंता किंवा वारंवार विसरणंयांसारखी लक्षणं दिसू शकतात.

शरीराचा समतोल बिघडणं

जर ट्यूमर सेरेबेलम किंवा मोटर कंट्रोल भागावर दबाव टाकत असेल तर शरीराचा समतोल बिघडण्याची शक्यता असते. वारंवार ठेच लागणं, चक्कर येणं, नीट चालता न येणं किंवा हात-पाय अशक्त होणं ही लक्षणं यावेळी दिसू शकतात. जर ही लक्षणं शरीराच्या एका बाजूला अधिक दिसत असतील, तर ट्यूमर असण्याची शक्यता अधिक असते.

काय काळजी घ्यावी?

बहुतांश डोकेदुखी सामान्य आणि तात्पुरत्या असतात. पण जर दुखणं वेगळं वाटत असेल वारंवार होत असेल आणि त्यासोबत वरील लक्षणं दिसत असतील तर याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar death News LIVE Updates : महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी दिवस...; एकनाथ शिंदेंची अजितदादांना श्रद्धांजली

Ajit pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निधन, विमानातील सहकाऱ्यांची आणि वैमानिकांची नावे समोर

EPFO 3.0: ईपीएफओमध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा? ऑनलाइन अन् ऑफलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Bharat Gogawale emotional reaction: महाराष्ट्राने निर्भीड व्यक्तीमत्त्व गमावलं, दादांच्या निधनाने मंत्री भरत गोगावले भावूक

Tirgrahi Yog: 200 वर्षांनंतर या राशींवर पडणार पैशांचा पाऊस; त्रिग्रही राजयोगाने होणार मालामाल

SCROLL FOR NEXT