Blood Pressure Care GOOGLE
लाईफस्टाईल

Blood Pressure Medicines: BP च्या गोळ्या घेताना तुम्हीही करताय 'ही' चूक; तज्ज्ञांनी सांगितली योग्य पद्धत

High Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या गोळ्या घेताना वेळ, आहार, व्यायाम आणि डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे. चुकीच्या पद्धतीमुळे औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो आणि गंभीर दुष्परिणाम संभवतात.

Sakshi Sunil Jadhav

सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे लांबच्या प्रवासामुळे लोक खूप थकून जातात. याने त्यांच्या पुढील कामात जेवणात, झोपण्यात बदल होतात. एखाद्या वेळेस काम जास्त असेल तर उशीरा झोपणं किंवा कमी झोपणं ठीक आहे. पण रात्री जागून मोबाईल बघणं, ओटीटीचा वापर करणं हे योग्य नाही. त्यामुळे तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. ही समस्या लोकांना खूप साधी किंवा नॉर्मल आहे असं वाटतं. पण त्याचा परिणाम तुमच्या मेंदूवर, ह्रदयावर आणि मूत्रपिंडांसारख्या महत्वाच्या अवयवांवर होतो.

त्यातच उच्च रक्तदाब ही समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. लोक गोळ्यातर वेळेवर घेतात पण त्यांना फरक जाणवत नाही. याचं कारण डॉक्टरांनी पुढील लेखात स्पष्ट केले आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

कोणताही समस्येवर आजारावरच्या गोळ्या घेण्याआधी तुम्ही इतर गोष्टींचे पालन करणे महत्वाचे आहे. त्यासाठी सगळ्यात आधी वेळेवर औषध घ्या. त्याने तुमच्या शरीरातील औषधाची पातळी स्थिर राहते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. औषध घेण्यापुर्वी तुमचा आहार तपासा म्हणजे आपण काय खातोय, ते पौष्टीक आहे का? तेलाचे प्रमाण याकडे लक्ष द्या. त्यासोबतच रोजच्या रोज व्यायाम, हालचाल, वजन वाढत तर नाहीये ना? याकडे लक्ष द्या. याने काय होईल? तर तुमच्यावर औषधांचा परिणाम जास्त चांगल्या प्रकारे होईल.

बीपीच्या गोळ्या घेताना किंवा घेण्यापुर्वी तुम्ही एखाद्या ठिकाणी जसं खुर्ची, बेड किंवा कुठेही शांत बसून राहणं गरजेचे आहे. त्यावेळेस जास्त हालचाल, आरडा ओरडा, जास्त जोरात बोलणे तुम्ही टाळले पाहिजे. कारण जास्त ताणामुळे तुमच्या ह्रदयाची गती वाढते. याचसोबत तुम्हाला काहीवेळेस ही औषधे सुट होत नाहीत. म्हणेजच त्यांचा दुष्परिणामही जाणवू शकतो. तेव्हा पाय सुजणे, सतत कोरडा खोकला येणे,चक्कर येणे यांसारखी लक्षणे दिसतात. त्यावेळेस लगेचच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. नियमित तपासणी आणि फॉलोअपमुळे उपचार किती प्रभावी आहेत हे समजते आणि गरजेनुसार बदल करता येतात. घरच्या घरी रक्तदाब मोजून त्याची नोंद ठेवणेही फायदेशीर ठरते.

स्वतःहून औषधे घेणे किंवा इतर औषधांबरोबर डॉक्टरांचा सल्ला न घेता पूरक गोळ्या किंवा आयुर्वेदिक उत्पादने वापरणे टाळावे. अचानक औषधे बंद केल्यास रक्तदाब धोकादायक पातळीवर वाढू शकतो, ज्याला रिबाउंड हायपरटेन्शन म्हणतात. त्यामुळे कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांशी चर्चा करणे आवश्यक आहे.

यासोबतच पाणी पुरेसे पिणे आणि मद्यपान टाळणेही महत्त्वाचे आहे. विशेषतः लघवीचे प्रमाण वाढवणारी औषधे घेत असल्यास शरीरात पाण्याची कमतरता होऊ नये याची काळजी घ्यावी. मद्यपानामुळे औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो आणि चक्कर किंवा अशक्तपणा वाढू शकतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT