Bmw X5 Facelift Launch in India Saam Tv
लाईफस्टाईल

Bmw X5 Facelift Launch in India: स्टायलिश लूक, पॉवरफुल इंजिन; भारतात लॉन्च झाली 'ही' जबरदस्त लक्झरी कार

साम टिव्ही ब्युरो

Bmw X5 Facelift Launch in India: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी BMW ने भारतीय बाजारात X5 फेसलिफ्ट एसयूव्ही लॉन्च केली आहे. ही लक्झरी एसयूव्ही पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. उरला मानक म्हणून xdrive ऑल-व्हील ड्राइव्ह मिळेल.

BMW X5 ची एक्स-शोरूम किंमत 93.90 लाख रुपयांपासून सुरू होते. तर याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 1.06 कोटी रुपये आहे. चेन्नई येथील प्लांटमध्ये याचे उत्पादन करण्यात आले आहे. ही कार दोन ट्रिम xLine आणि M Sport मध्ये उपलब्ध आहे. कंपनीने यात अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. याचबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

फीचर्स

BMW ने या कारमध्ये ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम देखील समाविष्ट केली आहे, ज्यामध्ये अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरासह पार्किंग असिस्ट, रिव्हर्स असिस्ट, स्मार्टफोनद्वारे रिमोट पार्किंग आणि ड्राइव्ह रेकॉर्डिंग यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे. यासोबतच यामध्ये 6 एअरबॅग्ज, डायनॅमिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

BMW X5 फेसलिफ्ट इंटिरियर

X5 फेसलिफ्टच्या आतील भागात नवीन BMW वाइडस्क्रीन वक्र डिस्प्ले ट्विन-स्क्रीन पॅनेल आहे. यात 14.9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन आणि BMW च्या iDrive 8 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा 12.3-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळतो. (Latest Auto News in Marathi)

यात वायरलेस स्मार्टफोन इंटिग्रेशनसह देखील येत. यामध्ये हरमन कार्डन म्युझिक सिस्टीम, हेड-अप डिस्प्ले (एम स्पोर्ट ट्रिमवर) आणि हीटिंग फंक्शनसह स्पोर्ट सीट्स आणि एम स्पोर्ट ट्रिममध्ये हवेशीर सीट देखील मिळतात. ड्राइव्ह सिलेक्टरच्या जागी आता ग्लास टॉगल स्विच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT