Symptoms For Cancer
Symptoms For Cancer Saam Tv
लाईफस्टाईल

Symptoms For Cancer : तुमच्या लघवीतून रक्त येते ? असू शकतो कर्करोग, वेळीच ओळखा

कोमल दामुद्रे

Kidney Cancer : शरीराच्या महत्त्वाच्या भागापैकी एक किडनी आहे. शरीराचे संतुलन राखण्यासाठी किडनी आवश्यक असते आपल्या शरीरातील विषारी पदार्थ आणि रक्तातील अतिरिक्त पाणी लघवीद्वारे काढून टाकण्यासाठी किडनी कार्य करते.

लाल रक्तपेशी बनवणारे हार्मोन्स निर्माण करण्यासाठी किडनी सहकार्य करते. व्हिटॅमिन डीला सक्रिय स्वरूपात आणायचे काम किडनी (Kidney) करते. त्यामुळे एवढा महत्त्वाचा अवयव निरोगी असणे गरजेचे आहे. प्रौढांमध्ये रेनल सेल कार्सिनोमा मूत्रपिंडाच्या कर्करोगाचा (Cancer) सामान्य प्रकार आहे. याव्यतिरिक्त किडनी कॅन्सर खूप कमी आहे.

मुलांमध्ये ट्यूमर होताना दिसतो. सर्वसामान्य म्हणजे लघवीमध्ये रक्त येण्याचे अनेक कारणे असू शकतात, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष कधीही करू नका अशावेळी डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घेणे गरजेचे असते.

1. मूत्रपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे

मेयो क्लिनिकच्या मते, लघवीत रक्त येणे हे मूत्रपिंडात कर्करोग असण्याचे लक्षण असू शकते. त्यावेळी रक्ताचा रंग गुलाबी होतो किंवा लाल आणि कोला असू शकतो. दुसरे लक्षण म्हणजे पाठीत आणि पाठीच्या बाजूला तीव्र वेदना होतात.त्या वेदना लवकर कमी होत नाहीत. भूख कमी होणे हे किडनी कॅन्सर चे लक्षण असते. तसेच वजनात असामान्य घट, थकवा येणे, ताप येणे हे काही किडनी कॅन्सरची लक्षणे आहेत.

2. कोणत्या लोकांना किडनी कॅन्सरचा धोका असू शकतो.

धूम्रपान करणाऱ्या लोकांना किडनी कॅन्सरचा धोका असतो. तसेच तुम्ही मद्यपान करत असाल, लठ्ठ असाल तर तुम्हाला किडनी कॅन्सरचा धोका असू शकतो. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनाही किडनीचा कर्करोग होण्याची शक्यता असते. जे लोक दीर्घकाळ डायलिसिस करून घेत आहेत आणि मूत्रपिंड निकामी होण्यासाठी उपचार करत आहेत अशा लोकांना किडनी कॅन्सर होण्याची खूप दाट शक्यता असते. या लोकांनी किडनी कॅन्सरची तपासणी करायला हवी.

Cancer

3. किडनी कॅन्सर होऊ नये यासाठी काय करायला पाहिजे?

जर तुम्हाला धूम्रपान करण्याची सवय असेल तर ती त्वरित बंद करणे गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही किडनीच्या समस्येपासून दूर राहाल. धूम्रपान करण्याची सवय बंद होत नसेल तर धूम्रपान सोडण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या आहाराकडे लक्ष द्या. आहारात योग्य फळे भाज्यांचा समावेश करून तुम्ही या समस्यांपासून दूर होऊ शकतो तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजारापासून दूर राहण्यास मदत होईल. तुमच्या आहारात सीझनल फळभाज्यांचा समावेश करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांना झटका, भाजपने कापलं तिकीट; मुलाला दिली उमेदवारी

Vishal Patil हे भाजपची 'बी' टीम, Chandrahar Patil यांचा गंभीर आरोप

Sharayu Sonawane : साध्या सिंपल पारूचा वेस्टर्न अंदाज पाहिलात का ?

Today's Marathi News Live : लोकल ट्रेनमध्ये नशेखोर तरुणांच्या हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू

Hingoli News : निवडणूक कामात हलगर्जीपणा भोवला; महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राचार्यावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT