Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांना झटका, भाजपने कापलं तिकीट; मुलाला दिली उमेदवारी

Kaiserganj Lok Sabha Election 2024: भाजपने ब्रिजभूषण शरण सिंह यांचा पत्ता कट करत त्यांचा मुलगा करण भूषण सिंहला उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे हा ब्रिजभूषण यांना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. तर भाजपने रायबरेली मतदारसंघातून दिनेश प्रताप सिंह यांना तिकीट दिले आहे.
ब्रिजभूषण शरण सिंह यांना झटका, भाजपने कापलं तिकीट; मुलाला दिली उमेदवारी
Karan Bhushan Singh And Karan Bhushan SinghSaam Tv
Published On

भाजपकडून (BJP) उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) दोन प्रमुख मतदार संघातील उमेदवाराची नावं जाहीर करण्यात आली आहेत. भाजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (brij bhushan sharan singh) यांना मोठा धक्का बसला आहे. कैसरगंज लोकसभा मतदारसंघात भाजपने ब्रिजभूषण शरण सिंह यांचा पत्ता कट करत त्यांचा मुलगा करण भूषण सिंहला उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे हा ब्रिजभूषण यांना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. तर भाजपने रायबरेली मतदारसंघातून दिनेश प्रताप सिंह यांना तिकीट दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडून नुकताच उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदारसंघ आणि कैसरगंज मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी भाजपने उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. परिपत्रक जारी करत भाजपने कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून करण भूषण सिंह आणि रायबरेली मतदारसंघात दिनेश प्रताप सिंह यांना तिकीट दिल्याची माहिती सांगितली. उद्या हे दोन्ही उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

ब्रिजभूषण शरण सिंह यांना झटका, भाजपने कापलं तिकीट; मुलाला दिली उमेदवारी
PM Modi Speech: 'चहा विक्रेत्याने देशाची अर्थव्यवस्था ११ वरून ५व्या क्रमांकावर आणली'; पीएम मोदींनी गुजरातमध्ये काय सांगितलं?

भाजपने ब्रिजभूषण सिंह यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांना मोठा धक्का बसलाय. ब्रिजभूषण यांचा मुलगा करणला भाजपकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. करण भूषण सिंह हे पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत. याआधी त्यांनी कधीच निवडणूक लढवली नाही. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तुपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. याप्रकरणामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. या सर्व आरोपांनंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांनी भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

ब्रिजभूषण शरण सिंह यांना झटका, भाजपने कापलं तिकीट; मुलाला दिली उमेदवारी
Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

करण भूषण सिंह हे उत्तर प्रदेश कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. ते भारतीय कुस्ती संघाचे उपाध्यक्ष राहले आहेत. पण वडिलांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी देखील उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. करण भूषण सिंह यांचा जन्म 13 डिसेंबर 1990 रोजी झाला. करण भूषण सिंह यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. डबल ट्रॅप नेमबाजीत ते राष्ट्रीय खेळाडू राहिले आहेत. करण भूषण यांचे शिक्षण परदेशातून झाले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांना झटका, भाजपने कापलं तिकीट; मुलाला दिली उमेदवारी
PM Narendra Modi Rally : शहजादाला पंतप्रधान करण्यासाठी पाकिस्तानात प्रार्थना : PM मोदींचा राहुल गांधींवर पुन्हा निशाणा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com