जेवण बनवताना ते करपले तर कढई काळी पडते. तसेच जेवण बनवण्यासाठी सतत कढईचा वापर केल्याने देखील काही दिवसांनी ती काळी होण्यास सुरुवात होते. जेवण बनवताना आपण त्यात तेल आणि विविध पदार्थ शिजवतो. गॅसवर कढई तापल्यानंतर पदार्थ कढईला चिकटतात.
कढईला असलेलं तेल आणि करपल्यामुळे चिकटलेले पदार्थ यांमुळे कढई साफ करणे फार कठीण होते. कढई सहज आणि झटपट साफ करता येत नाही. त्यामुळे कढई हळूहळू काळी पडत जाते. कढई काळी पडल्यावर त्यात जेवण बनवू नये असंही काही व्यक्तींना वाटू लागतं.
त्यांमुळे भांडी घासताना सर्वात काळी झालेली कढई किंवा तवा सुद्धा अगदी चकचकीत स्वच्छ करण्याची जबाबदारी महिलांवर असते. मात्र अशा पद्धतीने कढई साफ करताना बरीत मेहनत घ्यावी लागते. काथ्याने भांडी घासताना हात अगदी दुखून येतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी काळीकुट्ट झालेली कढई कशी साफ करायची याबद्दल माहिती शोधली आहे.
पीठ - २ ते ३ चमचे
तांदूळ - २ चमचे
डिशवॉश बार - २ चमचे
मीठ - १ चमचा
बटाटा - १
कढई स्वच्छ करण्यासाठी लिक्विड बनवताना सर्वात आधी एक डिशवॉश बार बारीक चिरून घ्या. त्यानंतर यामध्ये थोडं पीठ, तांदूळ आणि मीठ टाकून एकत्र मिक्स करून घ्या. अशा पद्धतीने तयार झालेलं मिश्रण बटाटा मधोमध कापून त्यावर हे लिक्विड घ्या आणि कढईवर घासण्यास सुरूवात करा.
या टिप्सने कढई अगदी एका दिवसात चमकणार नाही. मात्र तु्म्ही आठवडाभर हे लिक्विड अप्लाय केले तर त्याने कढई अतिशय स्वच्छ होईल आणि चकचकीत चमकेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.