Birth Numerology 2024  Saam Tv
लाईफस्टाईल

Birth Numerology 2024 : या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचे २०२४ मध्ये उजळेल भाग्य, होतील आर्थिक लाभ; तुमची जन्मतारीख आहे का यात?

Birth Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक मूळ संख्येच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यंदाचे २०२४ हे वर्ष शनीचे वर्षमानले जात आहे. 2+0+2+4 केल्यास याची बेरीज ही ८ येत आहे.

कोमल दामुद्रे

Numerology Future Prediction Date Of Birth :

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे संक्रमण जितके महत्त्वाचे आहे तितकेच अंकशास्त्र देखील महत्त्वाचे असते. एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख जोडून संख्येला त्या व्यक्तीचा मूलांक म्हटले जाते.

अंकशास्त्रात प्रत्येक मूळ संख्येच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल विशेष गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यंदाचे २०२४ हे वर्ष शनीचे वर्षमानले जात आहे. 2+0+2+4 केल्यास याची बेरीज ही ८ येत आहे. अंकशास्त्रात ८ हा अंक शनीचा मानला जातो. यासाठी ज्या व्यक्तींचे मूल्यांक ८ आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अधिक लकी असणार आहे. जाणून घेऊया अंकशास्त्रानुसार २०२४ वर्ष कोणत्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर (Benefits) ठरु शकते.

1. मूलांक ५

ज्यांचा मूलांक ५ आहे त्या लोकांसाठी २०२४ चे वर्ष अधिक भाग्यवान ठरणार आहे. यावर्षी प्रवास अधिक होतील. परदेशी प्रवासाचीही शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नशीब तुमच्या बाजूने असेल. आरोग्याची (Health) काळजी घ्या.

2. मूलांक ६

मूलांक ६ असणाऱ्या लोकांसाठी हे नवीन वर्ष अधिक लाभदायक ठरेल. करिअरमध्ये बढतीची शक्यता आहे. आर्थिक (Money) स्थिती स्थिर राहिल. मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. प्रेम जीवनात रोमांस टिकून येईल. स्वत:वर लक्ष केंद्रित कराल.

3. मूलांक ७

७ मूलांक असणाऱ्या लोकांसाठी हे वर्ष लकी ठरणार आहे. रखडलेल्या कामांना गती मिळेल. लवकरच नवीन नात्यात जोडले जाल. प्रेमीयुगुलांसाठी हे वर्ष चांगले असेल. आरोग्याची काळजी घ्या, तणाव टाळा. करिअरमध्ये चढ-उतार होईल.

4. मूलांक ८

ज्यांचा मूलांक ८ आहे त्यांच्यासाठी हे वर्ष २०२४ अधिक फायदेशीर मानले जाते. नवीन काम सुरु केल्यास फायदा होईल. व्यवसायात नफा मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळेल. आरोग्य चांगले राहिल.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC आरक्षण संपवल्यात जमा..., व्हॉट्सअप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या; मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Kantara Chapter 1 Collection : बॉक्स ऑफिसवर 'कांतारा' चं तुफान, आठवड्याभरात पार केला 300 कोटींचा टप्पा

Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये असदउद्दीन ओवेसीची आज होणार सभा

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई, 34 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त, ५ जणांना अटक

Pune Terror Alert : पुण्यात मध्यरात्री ATS कडून २५ ठिकाणी छापेमारी, दहशतवादी नेटवर्क सक्रिय? अनेक संशयित ताब्यात

SCROLL FOR NEXT