Biparjoy Cyclone Saam Tv
लाईफस्टाईल

Biparjoy Cyclone : मान्सूनपूर्वी चक्रीवादळाचा धोका ! नागरिकांनो घाबरू नका, अशी घ्या काळजी

Cyclone Biparjoy Route Live Update : या चक्रीवादळाचा धोका येत्या २४ तास असेल असे हवामान विभागाने सांगितले आहे.

कोमल दामुद्रे

Cyclone In Arabian Sea : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टी तयार झाल्यामुळे बिपरजॉय चक्रीवादळात तयार झाले आहे. या चक्रीवादळाचा धोका येत्या २४ तास असेल असे हवामान विभागाने सांगितले आहे.

मुंबईत हवामान विभागाने याबातीत ट्विट केल्यानंतर नागिरकांच्या मनात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाची सरासरी ही समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर असेल. याचा धोका पश्चिम किनारपट्टीला असून कोकण (Konkan), रत्नागिरी, गोवा, मुंबई, ठाणे, पालघर या विभागांवर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाला तोंड देण्याची तयारी जरी प्रशासनाने केली असली तरी नागरिकांनी पुढीलप्रमाणे काळजी (Care) घ्यायला हवी.

1. मासेमारी

समुद्रामार्गे येणाऱ्या या चक्रीवादळाचा सर्वात आधी संपर्क येतो तो मासेमारीसाठी. याबाबत प्रशासनाने सुरक्षिततेचे नियमही दिले असेल तरी देखील मच्छीमार करणाऱ्यांनी यावेळी योग्य ती दक्षता घ्यायला हवी. मच्छीमार बांधवांनी अशावेळी समुद्रात जाऊ नये.

2. चक्रीवादळ येण्याआधी कशी घ्याल काळजी ?

  • आपले सामान सुरक्षित ठेवा. दरवाजे व खिडक्यांची देखील व्यवस्थित पाहाणी करावी.

  • घराच्याजवळ असणारे सुकलेले लाकूड किंवा झाडांपासून लांब राहा किंवा काढून टाका.

  • ज्या वस्तू अधिक जड नसतील त्या वेळीच बांधून ठेवा. विटा, कचऱ्याचे डबे, पत्रे या वस्तूंना लांब ठेवा.

  • लाकडी फळ्या तयार ठेवाव्यात ज्यामुळे गरज पडल्यास काचेच्या खिडक्यांना आच्छादित करता येईल.

3. चक्रीवादळ आल्यानंतर

  • वादळ आल्यानंतर घराबाहेर पडू नका. जरी घराबाहेर असल्यास कोणत्याही झाडाचा किंवा विजेच्या खांबाचा सहारा घेऊ नका.

  • अफवांकडे लक्ष देऊ नका ज्यामुळे आपल्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होते.

  • तसेच किनारपट्टी, खाडी व पाणथळ या क्षेत्रांपासून दूर राहा.

  • आपल्या फोन (Phone)-लॅपटॉपला चार्जिंग, खाण्यापिण्याच्या इतर वस्तू, दिवे किंवा बॅटरी अशा गोष्टी देखील आधीच सोबत ठेवा

  • त्यासोबतच काही घरगुती औषधे देखील सोबत ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali Photos : गोल्डन साडी अन् मोकळे केस, प्राजक्ताच्या मनमोहक रूपाने केलाय कहर

Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगीरी व्यक्त, कारण काय?

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडिया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

SCROLL FOR NEXT