कोमल दामुद्रे
मसाला चहा हा भारतीय लोकांचे सर्वाधिक आवडते पेय आहे. यामध्ये औषधी वनस्पती आणि मसाले जोडल्याने तो आरोग्यदायी बनतो आणि रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
हळद आणि काळी मिरचा चहा बॅक्टेरिया आणि बुरशी विरोधात खूप फायदेशीर ठरते.
आल्याचा चहा हा पावसाळ्यात आपल्या आहारात समाविष्ट करण्यासाठी सर्वोत्तम मसाल्यांपैकी एक आहे. त्यात अँटी-इम्प्लामेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
बद्धकोष्ठता बरी करण्यापासून ते ऍलर्जीचा सामना करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यापर्यंत मध व दालचिनीचे अनेक फायदे आहेत. याचा चहा प्यायल्याने अनेक आजारांना विळखा बसतो.
लसूण आणि मध यांचे मिश्रण पावसाळ्यात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. याचे पेय प्यायल्याने संसर्गजन्य आजारांपासून सुटका होते.
ग्रीन टी आरोग्यासाठी अतिशय चांगला असतो. मेंदूतील ताणाला कारणीभूत असणाऱ्या रासायनिक पदार्थांना नियंत्रणात आणण्यासाठी याचा फायदा होतो.