Bike Engine Oil Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Bike Engine Oil Tips: बाईकचे इंजिन ऑइल कधी बदलायचे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा बसेल पैशांचा फटका !

Bike Engine Oil Change Tips: बाईक अधिक काळ टिकावी यासाठी आपण ती विकत घेताना तिच्या इतर गोष्टी तपासून बघतो.

कोमल दामुद्रे

Bike Care Tips: हल्ली प्रत्येकजण बाईक नाहीतर कार वापरतो. शहरात तर या अधिक प्रमाणात दिसून येतात. बाईक अधिक काळ टिकावी यासाठी आपण ती विकत घेताना तिच्या इतर गोष्टी तपासून बघतो. त्याच्या किमतीपासून ते ती किती वर्षापर्यंत टिकेल हे आपण तपासतो.

बाईक घेतल्यानंतर आपण तिचे इंजिन (Engine), ऑइल आणि इतर सर्व्हिसिंग याचा समावेश होत असतो. कोणत्याही वाहनांमध्ये त्याचे इंजिन हे अधिक महत्त्वाचे आहे. तुमच्या वाहनाला सुरक्षित ठेवण्यासाठी इंजिनचे काम महत्त्वपूर्ण ठरते. परंतु, जर तुमच्या बाईकचे इंजिन खराब झाले आहे किंवा आता ते बदलायला हवे हे कसे कळेल जाणून घेऊया त्याबद्दल

1. आवाज

बाईक सुरु केल्यानंतर इंजिन नेहमीपेक्षा जास्त आवाज करत असेल तर त्याचे इंजिन ऑइल बदलण्याची वेळ (Time) आले आहे असे समजावे. त्यासाठी त्याची एकदा सर्व्हिंसिंग करुन घ्यावी.

2. काळे तेल व किरकिर

इंजिन ऑइल तपासण्यासाठी बाईकमध्ये डिपस्टिक दिली जाते. बाईकचे इंजिन थंड झाल्यावर डिपस्टिकने इंजिन तेल (Oil) तपासा. इंजिनमधून डिपस्टिक काढा, आता त्यासोबत निघणाऱ्या तेलाला स्पर्श करा. जर त्यातून काळे तेल निघत असले तर समजून घ्या की इंजिन ऑइल बदलणे आवश्यक आहे.

3. ऑइल लेव्हल

इंजिन ऑइल लेव्हल तपासण्यासाठी अनेक बाइक्सला इंजिनजवळ हवा बाहेर जाण्यासाठी होल दिला जाते. तर काही बाइक्समध्ये इंजिन ऑइलची पातळीही डिपस्टिकने तपासली जाते. इंजिनमधील तेल असणाऱ्या पातळीपेक्षा कमी असल्यास ते बदलून घ्यायला हवे.

4. वॉर्निंग लाइट

नवीन आणि आधुनिक मोटारसायकल इंजिन सेन्सर्ससह येत असल्यामुळे बाईकच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर दिसणार्‍या लाईटद्वारे कळते की, इंजिनमध्ये तेल नाही किंवा ते कमी आहे. या सगळ्याची काळजी घेतल्यास आपली बाईक लवकर खराब होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

SCROLL FOR NEXT