Big Display Smartphone Saam Tv
लाईफस्टाईल

Big Display Smartphone : जबरदस्त बॅटरी अन् मोठा डिस्प्ले असणारे स्मार्टफोन, वनप्लससह या फोनचा समावेश

Shraddha Thik

Big Display Smartphone Buying :

आजकाल सगळ्यांकडेच स्मार्टफोन असतात. त्यावरच बहूतेकांचे काम सुरू असते. अनेकांना त्यांच्या फोनचा डिस्प्ले लहान वाटतो आणि काम (Work) करायला अडचण येते. त्यामुळे जर तुम्ही मोठा डिस्प्ले असलेला फोन शोधत असाल ज्याची किंमत तुमच्या बजेटमध्ये (Budget) असेल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत की कोणते स्मार्टफोन मोठ्या डिस्प्लेसह येतात आणि त्यांची किंमत काय आहे. जाणून घेऊया - ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाजारात असे अनेक फोन (Phone) उपलब्ध आहेत जे मोठ्या डिस्प्लेसह येतात. या स्मार्टफोन्समध्ये केवळ मोठे डिस्प्लेच नाहीत तर अनेक युनिक फीचर्स देखील आहेत ज्यामुळे युजर्सचा अनुभव उत्कृष्ट होतो. जेणेकरुन तुम्हाला स्वतःसाठी सर्वोत्तम फोनसाठी जास्त शोध घ्यावी लागणार नाही. येथे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणते फोन आहेत जे मोठ्या डिस्प्लेसह येतात.पाहा यादी -

Samsung Galaxy S21 FE

या सॅमसंग फोनमध्ये 6.4-इंचाचा फुल HD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश दर आणि 240Hz पर्यंत टच सॅम्पलिंग रेट ऑफर करतो. तुम्ही हा फोन Amazon वर मिळवू शकता जरी या फोनची मूळ किंमत 74,999 रुपये आहे, परंतु आजकाल Amazon वर चालू असलेल्या सेल दरम्यान तुम्हाला हा फोन 54 टक्के डिस्काउंटसह 34,760 रुपयांना मिळत आहे.

OnePlus 11 5G

OnePlus चा हा फोन 6.7 इंच 120 Hz AMOLED QHD डिस्प्ले सह येतो. या फोनमध्ये तुम्हाला फोटो-व्हिडिओसाठी 50 मेगापिक्सेलचा रियर प्रायमरी कॅमेरा मिळत आहे. तुम्हाला हा फोन Amazon वर 61,999 रुपयांना मिळत आहे. जर तुम्हाला संपूर्ण पेमेंट एकाच वेळी करायचे नसेल, तर प्लॅटफॉर्म तुम्हाला EMI चा पर्याय देखील देत आहे. यासाठी तुम्हाला फक्त 6,225 रुपये मोजावे लागतील.

Samsung Galaxy Z Fold 3

बरं, 'फोल्डेबल' नावावरूनच कळतं की त्यात फोल्डेबल डिस्प्ले आहे, त्यामुळे हा मोठा डिस्प्ले असलेला फोन आहे हे उघड आहे. यामध्ये, तुम्हाला 7.6 इंचाचा प्राथमिक QXGA+ (2,208×1,768 पिक्सेल) डायनॅमिक AMOLED 2X इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. Samsung Galaxy Z Fold 3 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह व्हेरिएंटची किंमत 1,49,999 रुपये आहे. जर तुम्ही 12GB रॅम + 512GB स्टोरेज फोन खरेदी केला तर त्यासाठी तुम्हाला 1,57,999 रुपये खर्च करावे लागतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT