Sankasht Chaturthi 2024, Sankashti Chaturthi 2024 In March  Saam Tv
लाईफस्टाईल

Sankasht Chaturthi 2024 : फाल्गुन महिन्यातील संकष्ट चतुर्थी कधी? शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Sankashti Chaturthi 2024 In March : संकष्टी चतुर्थी ही हिंदू पंचागातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस. ही चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाते.

कोमल दामुद्रे

March Sankashti Chaturthi Date:

संकष्टी चतुर्थी ही हिंदू पंचागातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस. ही चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरी केली जाते. यंदा फाल्गुन महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही २८ मार्चला असणार आहे.

हिंदू धर्मात श्रीगणेशाला (Ganpati) अधिक महत्त्व आहे. या संकष्टीला भालचंद्र संकष्टी म्हणूनही ओळखले जाते. शुभ कार्यात श्रीगणेशाला पूजनीय मानले जाते. भगवान गणेशाची बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्य देवता म्हणून पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गणपतीची पूजा केल्याने कीर्ती, संपत्ती, वैभव आणि उत्तम आरोग्य (Health) लाभते. जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीची तिथी, पूजा आणि पद्धत

1. संकष्टी चतुर्थी तिथी

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथीला यंदा संकष्ट चतुर्थी (sankashti chaturthi) असणार आहे. पंचांगानुसार २८ मार्चला संध्याकाळी ६.५६ मिनिटांनी सुरु होईल तर २९ मार्चला रात्री ८.२० मिनिटांनी संपेल. संकष्ट चतुर्थी चंद्रोदय वेळ ०९.०९ मिनिटांपर्यंत असेल.

2. पूजेची पद्धत

  • भालचंद्र संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी उठून स्नान करावे आणि व्रत करण्याचा संकल्प करा.

  • श्रीगणेशाची पूर्ण विधीपूर्वक पूजा करा.

  • त्यानंतर तीळ, गूळ, लाडू, दुर्वा, चंदन आणि मोदक अर्पण करा.

  • तसेच ओम गं गणपतये नमः मंत्राचा जप करा.

  • गणपतीला लाडू अर्पण करा. तसेच श्रीगणेशाच्या मंत्राचा जप करा. जर तुम्ही उपवास करत असाल तर तामसिक अन्नपदार्थाचे (Food) सेवन करू नका.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

Narendra Modi News: पुण्यात PM नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी; पोलिसांची अचानक धावाधाव

SCROLL FOR NEXT