मुंबई : कधीतरी कुठली नाजूक परिस्थिती सांभाळण्यासाठी अथवा एखाद्याला दु:खी होण्यापासून वाचवण्यासाठी थोडे खोटे बोलणे ठीक आहे. परंतु काही राशींचे लोक हे प्रत्येक गोष्टीत खोटं बोलतात असतात . त्यांच्या खोट्या बोलण्याचा कोणावर काय परिणाम होईल याची थोडी सुद्धा काळजी त्यांना नसते. त्यांच्याकडे फक्त आपली गोष्ट सिद्ध करण्याचा हट्टीपणा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार असे माणले जाते की अशा स्वभावाच्या चार राशी आहेत जे स्वतःच खरं करण्यासाठी निपुण असतात.
मिथुन राशी
या राशीच्या व्यक्तींना जर ते काही बोलून गेले तर ते सिद्ध करून दाखवण्यासाठी ते आपल्या समोरच्या व्यक्तीला आपल्या शब्दांमध्ये गुंतवतात. त्यांच्या अश्या वागण्यामुळे या राशीच्या लोकांनी सांगितलेले खोटं देखील सत्य वाटू लागते. या राशीच्या लोकांचे बोलणे खूप गोड असते त्यासोबतच त्यांचे व्यक्तिमत्त्वही खूप आकर्षक करणारे असते, त्यामुळे एकदा लोक सहजपणे त्याच्या खोट्या गोष्टींमध्ये अडकतात आणि त्यांच्या खोट्या बोलण्यावर देखील विश्वास करतात.
हे देखील पहा -
सिंह राशी
या राशीच्या व्यक्तींना स्वतःला आकर्षणाचे केंद्र बनण्यास प्रचंड आवड असते. जेव्हा-जेव्हा त्यांना कोणाकडून धोका जाणवतो अथवा समोरचा त्यांचे स्थान घेईल असे वाटते, तेव्हा ते आधीच त्या परिस्थितीला कसे हाताळावे याचा प्लान करून ठेवतात आणि लोकांना त्यांच्या बोलण्यात गुंतवतात.
तूळ राशी
या राशीचे व्यक्ती स्वतःमुळे कोणालाही अडचणीत किंवा दुःखी पाहू शकत नाहीत. म्हणूनच या राशीच्या लोकांना जेव्हा असे वाटते की त्यांच्या बोलण्याने एखाद्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो तेव्हा ते सत्य नाही तर खोट्याचा आधार घेतात आणि परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतात.
कर्क राशी
या राशीचे लोकं खोटं बोलण्यात खूप माहिर असतात. या राशीचे लोकं सहसा खोटे बोलत नाही, परंतु जेव्हा ते असे करतात तेव्हा ते खूप आत्मविश्वासाने खोटं बोलतात.त्यांच्या अश्या स्वभावामुळे कोणीही त्यांचे खोटं पकडू शकत नाही.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.