Travel Recipes Ideas Saam Tv
लाईफस्टाईल

Travel Recipes Ideas : अचानक ठरलेल्या प्रवासात 'हे' पदार्थ बनतील झटपट, रेसिपी एकदा पहा

बाहेरचे खाण्यापेक्षा हे पदार्थ खा, बजेटमध्ये होईल सुखकर प्रवास

कोमल दामुद्रे

Travel Recipes Ideas : प्रवास करणे कोणाला आवडत नाही. सुट्टीच्या दिवशी मधल्या काळात आपण प्रवास करण्यावर अधिक भर देतो. प्रवास करताना आपण कुठे जायचे यापासून ते कुठे राहायचे हे सगळे ठरवले जाते. परंतु, कोणते पदार्थ प्रवासात खायला हवे या संभ्रमात आपण असतो.

बऱ्याच वेळा अनेकांना प्रवास (Travel) करण्याची आवडत असते पण प्रवास करताना आपल्या मळमळ, उलटी किंवा डोके जड होणे यांसारख्या अनेक समस्या होतात. अशावेळी प्रवास कोणते पदार्थ खायला हवे व टाळायला हवे हे आपल्याला माहित असते.

अनेकांना बाहेरचे पदार्थ खाणे आवडत नाही तर काहींचा बजेट नसतो. अशा परिस्थितीत घरी बनवलेले अन्न सोबत घेऊन जाण्याचा पर्याय उरतो. परंतु, कधीकधी ते खूप लवकर खराब होण्याची समस्या असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत, जे प्रवासात सहज नेले जाऊ शकतात आणि ते बरेच दिवस खराब होत नाहीत.

१. सुखा खाऊ - जर आपण अन्नाबद्दल बोललो तर बहुतेक असे खाद्यपदार्थ ठेवावे जे खराब होणार नाहीत. यासाठी शेव किंवा चटपटीत पदार्थ ठेवू शकतो. तसेच सुका खाऊमध्ये आपण स्नॅक्स, भेळ, चिप्स, बिस्कीटे ठेवू शकतो. तसेच चिवडा, चकली, शेंगदाणे, भाजलेली चना डाळ, खाकरा यांसारख्या गोष्टी नाश्ता म्हणून सोबत घेऊ शकता.

२. लिंबू पुदिना ज्युस - प्रवासादरम्यान पाणी (Water) पिणे आवश्यक आहे, परंतु जर आपल्याला कोणतेही पेय सोबत घ्यायचे असेल तर त्यासाठी लिंबू पुदिन्याचा ज्युस बनवू शकतो. हे करण्यासाठी पुदिन्याची पाने कुस्करून घ्या आणि पाण्यात लिंबाचा रस, थोडे मीठ आणि साखर मिसळा, रस तयार होईल.

३. तोंडाला येईल चव - प्रवासात अनेक वेळा तोंडाची टेस्ट बिघडते. यासाठी बडीशेप, लवंग आणि वेलची सोबत ठेवावी. यामुळे तोंडाची चव चांगली राहील.

४. व्हेज सॅण्डविच - सॅण्डविच हा प्रवासासाठी अनुकूल असणारा पदार्थ आहे कारण ते पटकन बनवता येतात. ते बनवण्यासाठी आवडीच्या भाज्या कापून नंतर ब्रेडवर मेयोनिज लावा. त्यावर टोमॅटो सॉस टाका आणि नंतर भाजी मधोमध ठेवून बेक करा.

५. सुकी भाजी - कारल्याची भाजी, भेंडी, सुका बटाटा आणि हरभरा डाळ कबाब इत्यादी खाऊ शकतो. पण भाजी शिजवताना पाण्याचा थेंबही वापरून चालणार नाही. तसेच तेलाचे प्रमाण जास्त ठेवावे लागेल.

६. चविष्ट चटण्या - प्रवासात लसूण-मिरचीची चटणी, शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी आणि खोबऱ्याची चटणी देखील घेऊ शकतो. ते लवकर खराब होत नाहीत आणि जेवणाची चवही वाढवतात. भाजी नसली तरी या उपयोगी पडू शकतात.

७. पराठे/ पुऱ्या - प्रवासात पराठे आणि पुरी सोबत घेऊ शकतो. पण ते बनवण्यासाठी पीठ पाण्याने मळून घ्यावे लागते. त्यामुळे ते बरेच दिवस खराब होत नाहीत, त्याचप्रमाणे त्यांची चवही चांगली लागते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT