Weekend Travelling : या विकेंडला रोड ट्रिप करण्याचा प्लान करताय तर, हे हॅक्स पडतील उपयोगी

विकेंडला रोड ट्रिपला जाताना अशी घ्या काळजी
Road trip hacks, Travel, Weekend plan
Road trip hacks, Travel, Weekend plan Saam Tv
Published On

Weekend Travelling : रोड ट्रिपला जाण्याचा योग आला की, पोटात गोळा येतो किंवा आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात. कुटुंबासह रोड ट्रिपला जाणे हा एक वेगळा अनुभव असतो. पण जर रोड ट्रिप खूप लांब असेल आणि मुले सोबत असतील तर रोड ट्रिप कंटाळवाणी आणि त्रासदायक असू शकते.

हे देखील पहा -

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत लांबच्या प्रवासात आपण खूप अस्वस्थ होतो. विशेषत: मुलांना एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणे अजिबात आवडत नाही. अशा परिस्थितीत काय करायचे आपल्याला समजत नाही. त्यासाठी आपण काही सोप्या हॅक्सचा वापर करुन आपली ट्रिप मजेदार बनवू शकतो.

१. आपण कारमधून रोड ट्रिपला (Trip) जात असू तर कपकेक लाइनर सोबत ठेवा. या प्रवासात (Travel) याचा आपल्याला खूप उपयोग होईल. हे कपकेक लाइनर्स कार कप होल्डरमध्ये ठेवू शकतो. यामुळे, कार कप अजिबात घाण होणार नाही. याशिवाय आपण मुलांसोबत रोड ट्रिपला जात असू तर या कपकेक लाइनर्समध्ये ठेवून आपण त्यांना काही खाद्यपदार्थ खाण्यास देऊ शकतो. यामुळे त्यांचे हात घाण होणार नाहीत आणि त्यांना खाणे खूप सोपे होईल.

Road trip hacks, Travel, Weekend plan
Butterfly Forest In India: फुलपाखरु छान किती दिसते ! भारतातल्या या फुलपाखराच्या जंगलाविषयी माहिती आहे का ?

२. प्रवासादरम्यान आपण बॅग कारमध्ये ठेवतो परंतु, मागच्या सीटवर शू ऑर्गनायझर किंवा डोअर ऑर्गनायझर देखील लटकवावे. यामुळे आपला प्रवास खूप सोपा होईल. आपण टिश्यू पेपरपासून ते मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाच्या छोट्या वस्तू सहज लटकवू शकतो. यामुळे रस्त्यावरील प्रवासादरम्यान कारमध्ये सामानाचे व्यवस्थापण करणे अधिक सोयीचे असते.

३. आपल्याला प्रवासाला अधिक मनोरंजन बनवण्यासाठी आपण प्रवासात काही गेम्स खेळू शकतो. ज्यामुळे मुलांना व स्वत:ला स्क्रिनपासून दूर ठेवता येईल. मुलांचे व कुटुंबातील इतर सदस्यांचे वय लक्षात घेऊन आपण हे गेम्स खेळायला हवे ज्यामुळे ते कंटाळणार नाही.

४. रोड ट्रिप दरम्यान मुलांना व्यस्त ठेवणे हे कठीण काम आहे. अशावेळी आपण त्यांच्यासाठी काही अ‍ॅक्टिव्हिटी बॅग पॅक करायला हवी. क्रेयॉनपासून स्टिकर्स, लहान नोटबुक, अॅक्टिव्हिटी पॅड आणि कलरिंग बुक्सपर्यंत सर्वकाही ठेवू शकतो. या अशा गोष्टी आहेत ज्या मुलांना खेळायला आवडतात आणि त्यांना वाटेत व्यस्त ठेवण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com