Paragliding : आकाशाला स्पर्श करण्याची इच्छा कुणाला नसते परंतु, पंखाशिवाय उडणे शक्य नाही. पण यासाठी आपल्याला पंखाची गरज नाही. गरज आहे ती पॅराग्लायडिंगची.
आपल्याला आकाशात उंच भरारी घ्यायची आहे, तर आपण पॅराग्लायडिंग करून फुग्यांसह उडू शकता आणि हवेत तरंगण्याचा आनंद घेऊ शकतात. सध्या पर्यटन स्थळांवर पॅराग्लायडिंगचा ट्रेंड (Trend) जोरात आहे. जर तुम्ही फिरायला गेलात आणि पॅराग्लायडिंग केले नाही तर तुमचे जीवन व्यर्थ आहे.
जर तुम्हाला देखील पॅराग्लायडिंगचा आनंद लुटायचा आहे तर जाणून घेऊया त्याच्याबद्दल
पॅराग्लायडिंगचे तिकीट?
पॅराग्लायडिंगचे भाडे भारतात (India) वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहे. पॅराग्लायडिंगचे भाडे तुमच्या राइडची वेळ आणि ठिकाण यानुसार आकारले जाते. पॅराग्लायडिंगचे तिकीट १००० ते ५००० पर्यंत असते.
भारतातील कोणत्या ठिकाणी पॅराग्लायडिंग केली जाते -
१. वागमोन- केरळ
पॅराग्लायडिंगसाठी वागामन हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. वागमोन हे केरळचे जमिनीपासून ३००० मीटर उंचीवर असलेले सुंदर हिल स्टेशन आहे. इथल्या निसर्गरम्य दृश्यांमध्ये पॅराग्लायडिंगची मजाच वेगळी आहे.
२. जोधपूर- राजस्थान
जोधपूर आपल्या राजवाड्याच्या सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. जोधपूरमध्ये १५०० फूट उंचीवर पॅराग्लायडिंगचा आनंद घेता येतो. राजस्थानमधील कडाक्याच्या उन्हात आकाशात उंच उडण्याची मजा वेगळीच आहे.
३. पाचगणी- महाराष्ट्र
पाचगणी हे महाराष्ट्रातील एक सुंदर हिल स्टेशन आहे. ते जमिनीपासून १२०० मीटर उंचीवर आहे. पाचगणीचे हवामान अतिशय सुंदर आहे. जर आपल्याला पॅराग्लायडिंगची आवड असेल तर पाचगणी जरूर भेट द्या.
४. बीर बिलिंग- हिमाचल प्रदेश
बीर बिलिंग हिमाचल प्रदेशातील एक डोंगराळ भाग आहे, जिथे पॅराग्लायडिंग केले जाते. येथे पॅराग्लायडिंगसाठी उत्तम प्रशिक्षक आणि सुरक्षा व्यवस्था आहे.
५. नैनिताल- उत्तराखंड
उत्तराखंडमधील नैनिताल हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या सुंदर ठिकाणी दूरदूरवरून पर्यटक येतात. नैनिताल २०० मीटर उंचीवर आहे, इथे पॅराग्लायडिंगची मजा वेगळीच आहे. नैनितालमध्ये पॅराग्लायडिंगची चांगली सोय आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.