Off Roading SUVs Saam Tv
लाईफस्टाईल

Off Roading SUVs : ऑफ रोड ड्रायव्हिंगसाठी या कार आहेत बेस्ट; डोंगर- दऱ्यांसह कुठेही आरामात चालवा, पाहा लिस्ट

Best Off Road Car : या एसयूवी तुम्हाला कोणत्याही रस्त्यावर एकदम चांगला अनुभव देतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Best Off Roading SUVs :

भारत देश हा निसर्गाने समृद्ध आहे. भारतात अनेक पर्वतरांगा, वाळवंट, डोंगर, दऱ्या आहेत. त्यात वळणावळणाचे रस्ते, डोंगर दऱ्यातील, खिंडीतील रस्ते आहेत. या रस्त्यांवर कार चालवायला सर्वांनाच आवडते. परंतु हे रस्ते जितके सुंदर असतात तेवढेच तिथे कार चालवायला अवघड आहे. या रस्त्यांवर खूप पॉवरफुल आणि दमदार फिचर्स असलेल्या कार चांगल्या चालतात. या पॉवरफुल वाहनांना एसयूवी म्हणतात. आम्ही तुम्हाला अशाच एसयूवी कारची माहिती देणार आहोत. ज्या कोणत्याही रस्त्यावर एकदम चांगला अनुभव देतील.

भारतात प्रत्येक महिन्याला नवनवीन कार लाँच होत असतात. यामध्ये एसयूवी कारची क्रेझ खूप जास्त आहे. एसयूवी कार या सर्वोत्तम कारपैंकी एक आहे. आज आम्ही तुम्हाला खडतर रस्त्यावरही चालवता येणाऱ्या एसयूवीची माहिती देणार आहोत.

1. महिंद्रा थार (Mahindra Thar)

महिंद्रा ही कार उत्पादनातील आघाडीची कंपनी आहे. कंपनीच्या कार नेहमीच ड्रायव्हरसाठी एक चांगला अनुभव देतात. या कंपनीची महिंद्रा थार ही लोकप्रिय कार आहे. या कारमध्ये 650 mm ची वॉटर वेडिंग कॅपेसिटी आणि 226mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे. या कारची किंमत 10.54 लाख रुपये आहे.

2. मारुती 5 डोअर जिमनी Maruti 5 Door Jimny

मारुती 5 डोअर जिमनी ही मारुतीची सर्वोत्कृष्ट कार आहे. मारुतीची ही कार यावर्षी लाँच झाली होती. कारची वॉटर वेडिंग क्षमता 300 मीमी आणि ग्राउंड क्लिअरन्स 210 मीमी आहे. या कारची किंमत 12.74 लाख रुपये आहे.

3. टोयोटा हिलक्स Toyota Hilux

टोयोटाची Toyota Hilux ही कार ऑफ रोडिंगसाठी ओळखळी जाते. या कारची वॉटर वेडिंग क्षमता 700 मीमी आणि ग्राउंड क्लिअरन्स 190 मीमी पर्यंत आहे. या कारची किंमत 36.80 लाख रुपये आहे.

4. इसुझू वी -क्रॉस Isuzu V -Cross

भारतात ऑफ रोडिंगसाठी अनेक कार आहेत. त्यातील एक म्हणजेIsuzu V -Cross. या कारची वेडिंग क्षमता 700mm आहे. तर ग्राउंड क्लिअरन्स 225mm आहे. ही कार तुम्ही 4x2 आणि 4x4 या दोन्ही प्रकारांमध्ये खरेदी करु शकता. या कारची किंमत 19.49 लाख रुपये आहे.

5. फोर्स गुरखा Force Gurkha

फोर्स गुरखा ही ऑफ रोडिंगसाठी जबरदस्त एसयूवी आहे. या कारती वॉटर वेडिंग क्षमता 700mm तर 205mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. या कारची किंमत 15 लाख रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT