Health Tip SAAM TV
लाईफस्टाईल

Health Tips : डाळ कुकरमध्ये उकडूनही राहते कच्ची? मग ही कुकिंग प्रोसेस ट्राय करा

Shreya Maskar

डाळ हा पोषक तत्वांचा खजिना आहे. त्यामुळे याचे योग्य पद्धतीने सेवन करणे गरजेचे आहे. जेणेकरून सर्व पोषक घटक आरोग्याला मिळतील. अनेक महिलांची अशी तक्रार असते की, डाळ कितीही शिजवली तरी कच्ची राहते. चला तर मग डाळ शिजवण्याची सर्वोत्तम पद्धत जाणून घेऊयात.

डाळ शिजवताना पाण्याचे प्रमाण?

डाळींमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. जे पाण्यात लवकर विरघळते. जर तुम्ही डाळीमध्ये जास्त पाणी घातल्यास व्हिटॅमिन सी निघून जाते. कधीही डाळ शिजवल्यानंतर त्यामधील पाणी काढून टाकून मगच डाळीला तडका द्यावा. डाळ उकडताना मयार्दीत प्रमाणात पाणी टाकणे महत्त्वाचे आहे. कधीही डाळीमध्ये एक ते दीड इंच भिजेल ऐवढेच पाणी घालावे.जास्त वेळ डाळ उकडल्याने डाळ फुटते आणि मऊ होते.

डाळ शिजवल्यावर उरलेले पाणी

डाळ शिजवल्यानंतर पाणी उरते. हे पाणी फेकून न देता याचा आहारात वापर करावा. कारण डाळीपेक्षा डाळीच्या पाण्यामध्ये पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे डाळीचे पाणी सूपमध्ये घालून प्यावे. यामुळे सूपमधील पोषक तत्व वाढतात.

डाळ शिजवताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • डाळ जास्त प्रमाणात शिजवल्यास त्यातील पोषक घटक कमी होतात.

  • डाळी मधील प्रथिनांचे प्रमाण टिकून ठेवण्यासाठी नेहमी डाळ कुकरमध्ये उकडावी.

  • बाजारात विविध प्रकारच्या डाळी उपलब्ध आहे. त्यामुळे वगवेगळ्या डाळीप्रमाणे शिजण्याची वेळ बदलत राहते.

  • मसूर आणि चणा डाळ लवकर शिजते.

  • डाळ मंद आचेवर उकडून घ्याव्या.

  • डाळ उकडून झाल्यावर १५ ते २० मिनिटे गरम पाण्यात ठेवा. त्यामुळे कधी डाळ कच्ची राहिल्यास पूर्ण शिजेल.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IT Act Amendment: केंद्राच्या फॅक्ट चेक युनिटला झटका, IT कायद्यातील दुरुस्ती असंवैधानिक, मुंबई हायकोर्टाची टिप्पणी

Navratri Recipes:नवरात्रीत कांदा-लसूण शिवाय बनवा पनीर मखनी; पाहा सोप्पी रेसिपी

Jasprit Bumrah Record: जसप्रीत बुमराहने रचला इतिहास! एका झटक्यात मोडला हरभजन सिंगचा मोठा रेकॉर्ड

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

MNS News : 'मराठी माणसाला काम देणार नाही' म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप!

SCROLL FOR NEXT