Tan Removal Home Remedy google
लाईफस्टाईल

Tan Removal Home Remedy: चेहरा, हात, पाय टॅन झालेत? 'या' सोप्या घरगुती उपायांचा लगेचच करा वापर

Tan Removal Tips: बाजारात तुम्हाला अनेक टॅनिंग कमी करण्यासाठी प्रोडक्ट सापडतील. पण त्याचा फायदा तुम्हाला जास्त काळ होईल याची शाश्वती नसते. त्यामुळे तुम्ही स्वयंपाक घरातल्या काही पदार्थांचा वापर करून नॅच्युरल पद्धतीचा वापर करू शकता.

Saam Tv

उन्हाळा वाढला की त्वचेच्या समस्या वाढत असतात. या ऋतुत टॅनिंगच्या समस्यांना जास्त प्रमाणात सामोरे जावे लागते. उन्हाळ्यात बाहेर जाताना स्कार्फचा वापर केला तरी आपला चेहरा, हात, पाय हे काळपट होत असतात. मुळात हा ऋतूच उन्हाळ्याचा असल्याने तुम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र यावर तुम्ही घरच्या घरी काही उपाय केलेत तर तुम्हाला टॅनिंग कमी होताना जाणवेल. जर तुम्ही टॅनिंग काढण्यासाठी काहीच उपचार करत नसाल तर तुम्हाला भविष्यात आणखी समस्यांना सामोरे जावे लागेल. चला तर जाणून घेऊया टॅनिंगवर घरगुती उपाय.

बाजारात तुम्हाला अनेक टॅनिंग रिमुअर प्रोडक्ट सापडतील. पण त्यामध्ये तुमचे पैसे वाया जातील. त्यासोबत तुम्हाला तेवढ्यापुर्तीच आराम मिळेल. अशा वेळेस तुम्ही घरगुती पद्धतीने टॅनिंग मास्क तयार करू शकता. चला तर जाणून घेऊया टॅनिंगवर घरगुती मास्क कसे तयार करायचे.

१. दही आणि बेसन

दही आणि बेसन स्किनला डी-टॅन करण्यासाठी खूप फायदेशीर असतं. त्याने तुमच्या चेहऱ्यावरचा काळपट रंग कमी होतो. हे मास्क बनवण्यासाठी दही, बेसन, हळद आणि लिंबाचा रस मिक्स करून छान पेस्ट करून घ्या. हे तुम्ही १५ ते २० मिनिटे त्वचेला लावून थंड पाण्याने धुवून घ्या.

२. टोमॅटो आणि लिंबू

त्वचेचा काळपटपणा दूर करण्यासाठी तसेच त्वचा उजळ दिसण्यासाठी तुम्ही टोमॅटो आणि लिंबाचा वापर करू शकता. हे मास्क तयार करताना, १ पिकलेला टोमॅटो घ्या त्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस मिक्स करा. आता टॅनिंग असलेल्या भागावर मिश्रण लावा. १५ ते २० मिनिटांनी हे मास्क स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. हे तुम्ही रोज करू शकता. त्याने काळपटपणा लवकरात लवकर निघून जाईल.

३. पपई आणि मध

पपई आणि मधामधील गुणधर्मांमुळे तुमचे टॅनिंग कमी होण्यास जास्त मदत होते. त्यासाठी ३ ते ४ पपईचे तुकड्यांची पेस्ट करून घ्या. त्यामध्ये १ चमचा भर मध मिक्स करून चेहऱ्याला लावा. १५ ते २० मिनिटांनी हे मास्क थंड पाण्याने धुवून घ्या. याने तुमची स्किन नॅच्युरली एक्सफोलिएट होण्यास मदत होईल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT