Benefits of sandalwood  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

सुवासिक चंदनाचे आरोग्यासाठी असेही फायदे !

बहुगुणी चंदनाचे फायदे नेमके काय आहे हे जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शतकानुशतके चालत आलेल्या परंपरेत चंदनाला मानले जाते. धार्मिक गोष्टीत चंदनाला अधिक महत्त्व मिळाले आहे. चंदनाचे जितके धार्मिक गोष्टीत स्थान आहे तितकेच आयुर्वेदातही आहे. याशिवाय अनेक कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर केला जातो. चंदनाच्या फेसपॅक, परफ्यूम, रूम फ्रेशनरपर्यंत असंख्य उत्पादने बाजारात आहेत. बदलत्या ट्रेंडमध्येही, चंदनाने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. परंतु, या चंदनाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे होतात. चंदनात असणाऱ्या अनेक गुणधर्मांबद्दल आज आपण पाहणार आहोत.

हे देखील पहा -

चंदनाचे आपल्या शरीरासाठी हे फायदे आहेत

१. तापावर गुणकारी -

ताप आल्यावर शरीराचे तापमान कमी करण्यासाठी अनेकदा डोक्यावर थंड पाण्याची (Water) पट्टी ठेवली जाते. परंतु, थंड पाण्याची पट्ट्यांबरोबर तापामध्ये चंदनही अधिक फायदेशीर ठरते. चंदनाची पेस्ट कपाळावर लावल्याने ती नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करते. चंदनाच्या पेस्टने शरीराचे तापमान सामान्य होण्यास मदत होते.

२. चमकदार त्वचेचे रहस्य -

नैसर्गिक वस्तू चेहऱ्याला लावल्यास त्वचेला (Skin) कोणतीही हानी पोहोचत नाही. यामुळेच हल्ली काही कॉस्मेटिक उत्पादनांमध्ये चंदनापासून ते त्यांच्या सुवासिकतेचा वापर केला जात आहे. परंतु, यात रासायनिक उत्पादनांचा उपयोग केला जातो. त्वचा सुधारण्यासाठी चंदन पावडरचा फेस पॅकही लावला जातो. यामुळे त्वचेवर चमक तर येतेच पण त्वचेचा रंगही उजळतो.

३. डोकेदुखीवर गुणकारी -

डोकेदुखीच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी चंदनाचा वापर केला जातो. बऱ्याच वेळा उष्णतेमुळे डोक्याच्या नसा ताणल्या जातात, त्यामुळे डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो. अशा वेळी डोक्यावर चंदनाची पेस्ट लावल्यास डोके थंड (Cold) राहण्यास मदत होते आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे . कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Gaikwad : बाईबद्दलच्या त्या वक्तव्यानं आमदार संजय गायकवाड अडचणीत; मध्यरात्री थेट गुन्हा दाखल

IAS Officer ला सस्पेंड करण्याचा अधिकार नेमका कोणाकडे असतो? राज्य की केंद्र सरकार?

Daughter Property Rights : मुलींना वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा कधी मिळत नाही? काय आहेत नियम, जाणून घ्या

Sunday Horoscope: पैशांची बरसात अन् घरात आनंद! रविवारचा 'या' ५ राशींसाठी घेऊन येणार मोठी खुशखबर

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT