Benefits Of Apple Tea Saam Tv
लाईफस्टाईल

Benefits Of Apple Tea : अॅपल टीचे आरोग्याला अनेक फायदे, मधुमेहासोबत ब्लड शुगरही कंट्रोल करेल !

अनेक संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अॅपल टी प्यायल्याने साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

कोमल दामुद्रे

Benefits Of Apple Tea : हल्ली दिवसाची सुरुवात चहा, कॉफी किंवा ग्रीन टीने होते. मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे लठ्ठपणा व रक्तातील साखर नियंत्रणात राहते. याशिवाय उच्च रक्तदाबासह इतर अनेक आजारांवर ग्रीन टी फायदेशीर ठरते. तसेच, काही लोक रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी पेरू आणि आंब्याच्या पानांचा चहा पितात.

वाढत्या साखरेवरही अॅपल टीने नियंत्रण ठेवता येते. अनेक संशोधनांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अॅपल टी प्यायल्याने साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. अॅपल टीचे फायदे जाणून घेऊया-

1. बद्धकोष्ठतेमध्ये आराम मिळेल

जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल आणि त्यापासून सुटका मिळवू इच्छित असाल तर तुम्ही दररोज अॅपल टीचे सेवन करू शकता. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. फायबरमुळे पचनक्रिया मजबूत होते. तसेच मेटाबॉलिझमला चालना मिळते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.

2. हाडे मजबूत होतात

सफरचंदात मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन-सी आणि सोडियम मुबलक प्रमाणात आढळतात. हे सर्व आवश्यक पोषक हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यासाठी तुम्ही दररोज अॅपल टीचे सेवन करू शकता.

3. उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो

सफरचंदात पोटॅशियम आढळते. पोटॅशियम युक्त अन्न खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. पोटॅशियम शरीरातील सोडियमचे संतुलन राखते. सोडियमचे संतुलन उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवते. यासाठी अॅपल टीने सकाळची सुरुवात करा.

4. दृष्टी वाढते

अॅपल टीमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात. हे आवश्यक पोषक डोळ्यांची समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते. यासोबतच दृष्टीही वाढते.

5. साखर (Sugar) नियंत्रणात राहते

त्यात अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि फायबर असतात. हे सर्व आवश्यक पौष्टिक घटक साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांना साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अॅपल टी पिण्याचा सल्लाही आरोग्य तज्ज्ञ देतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Maharashtra Live News Update: शिवसेना उबाठाचे गोकुळ दूध संघावर भ्रष्टाचाराचे आरोप

Ananya Panday: अनन्या पांडेचा मीडियासमोर फोटो काढण्यास नकार, कारणही सांगितलं, म्हणाली- मी ५ वाजता उठले...

पोलीस कॉन्स्टबलचा रस्ते अपघातात मृत्यू, बातमी कळताच पत्नीला मोठा धक्का, निराशेतून धक्कादायक पाऊल

Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या घड्याळाची किंमत आशिया कपच्या प्राइज मनीपेक्षा ८ पट जास्त; किंमत ऐकून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT