Face Care Tips  Saam Tv
लाईफस्टाईल

Face Care Tips : पार्टनरसोबत फिरायला जाण्यापूर्वी अशी घ्या चेहऱ्याची काळजी!

Face Care For Date : मेकअप केल्याने तुमची त्वचा अतिशय सुंदर आणि ग्लोविंग दिसते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Face Care : मेकअप केल्याने तुमची त्वचा अतिशय सुंदर आणि ग्लोविंग दिसते. परंतु मेकअप च्या आधी तुमची त्वचा साफ नसेल तर तुमचा मेकअप काळा पडू लागतो. तुम्हाला तुमचा चेहरा साफसूत्रा ठेवायचं असेल तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

लवर्ससाठी डेटवर जाणे अतिशय खास असते. या दिवशी अनेक पार्टनर (Partner) वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅनिंग करतात आणि एकमेकांना स्पेशल फील करवतात. थंडीच्या दिवसांमध्ये कपल्स एकमेकांसोबत डेटवर (Date) जाण्याचे प्लॅनिंग सुद्धा करतात.

जर तुम्ही सुद्धा तुमच्या पार्टनर सोबत डेटवर जात असाल तर, तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची काळजी घेतली पाहिजे. मुलगा असो किंवा मुलगी मेकअप करून चेहऱ्यावरील काळे डाग किंवा इतर कोणतीही समस्या अगदी सहजपणे लपवू शकतात. परंतु तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने चेहरा साफ ठेवायचा असेल तर तुम्हाला या ट्रिक्स वापराव्या लागतील.

ट्रिक 1 -

चेहरा साफ करण्यासाठी मसूरची डाळ रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी डाळ मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये कच्च दूध मिक्स करून एक पेस्ट तयार करून घ्या. आता ही पेस्ट पाच ते दहा मिनिटे चेहऱ्यावरती लावून ठेवा. वेळ झाल्यानंतर चेहरा धुऊन टाका. चेहरा अतिशय साफसूत्रा होईल.

ट्रिक 2 -

दुसऱ्या ट्रिक मध्ये तुम्हाला बादाम आणि दह्याची गरज लागेल. यासाठी सुके बदाम मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये दही कळवून त्याची एक पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टला चेहऱ्यावर आणि मानेवर लागवड पाच ते दहा मिनिटे मसाज करा. वेळ झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.

ट्रिक 3 -

चेहरा चांगल्या प्रकारे साफ करण्यासाठी कॉफी अतिशय फायदेशीर ठरते. यासाठी तुम्हाला कॉफीमध्ये मध मिसळून एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही पेस्ट तुम्हाला चेहऱ्यावरती काही वेळ लावून ठेवायची आहे. पंधरा ते वीस मिनिटे झाल्यावर तुम्हाला चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन काढायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Elections : काँग्रेसला मोठा धक्का, पुण्यातील नेत्याने ४० वर्षांची साथ सोडली, हातात घड्याळ बांधलं

Washim : वाशिममध्ये एमआयएमची मुसंडी, पहिल्यांदाच नगरपालिकेवर सत्ता मिळवली, भाजपचा पराभव

Maharashtra Live News Update: पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग

Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी टिव्हीवर येणार; दमदार होस्टिंगने शो गाजवणार, पाहा धमाकेदार VIDEO

Aadhaar-Pan Link: उरले शेवटचे ७ दिवस! हे काम आताच करा अन्यथा पॅन कार्ड होईल बंद

SCROLL FOR NEXT