Mehendi Remove Tips Saam TV
लाईफस्टाईल

Mehendi Remove Tips : हातांवर फिकी पडलेली मेहंदी झटपट होईल गायब; घरच्याघरी आजच ट्राय करा हा उपाय

How to Remove Mehandi Frome Hand : हातांवरील मेहंदीला छान काळा रंग आल्यावर ती फारच सुंदर दिसते. मात्र अशी मेहंदी काही दिवसांनी हातांवरून निघू लागते तेव्हा हात फारच खराब दिसतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लग्न समारंभ असो अथवा सणसमारंभ, प्रत्येक महिला आणि मुली सुंदर दिसण्यासाठी हातांवर मेहंदी काढतात. मेहंदीच्या विविध डिझाइन्सने हात रंगवले जातात. मेहंदी काढल्यावर ती जास्तीत जास्त रंगावी यासाठी देखील विविध ट्रिक्स फॉलो करतात. हातांवरील मेहंदीला छान काळा रंग आल्यावर ती फारच सुंदर दिसते. मात्र अशी मेहंदी काही दिवसांनी हातांवरून निघू लागते तेव्हा हात फारच खराब दिसतात.

मेहंदी काळी झाल्यावर ती हातांना जास्त चिकटून राहते. त्यामुळे मेहंदी निघताना त्याचे पापुद्रे आपल्या हातांवर रखरखीत लागतात. आपल्याला स्वत:ला अशी मेहंदी नकोशी वाटते. त्यामुळे मेहंदीचा रंग फिका पडल्यावर किंवा ती हातातून निघत असताना काय काळजी घेतली पाहिजे याचीच माहिती आज जाणून घेणार आहोत.

ऑलिव ऑइल आणि मीठ

मेहंदी काढण्यासाठी हातांवर आधी मीठ घ्या. त्यात थोडे ऑलिव ऑइल सुद्धा घ्या आणि दोन्हींची पेस्ट हातांवर चोळत राहा. हात एकमेकांना चोळून देखील मेहंदी सहज निघून जाते. मीठ आपल्या हातांवर स्क्रबप्रमाणे काम करते. तर ऑलिव ऑइल आपल्या स्किनला मुलायम ठेवते. त्यामुळे फक्त मीठ न वापरता त्यात ऑलिव ऑइल सुद्धा मिक्स करा.

टूथपेस्ट

टूथपेस्टचा वापर अनेक व्यक्ती कपड्यांवर असलेले डाग घालवण्यासाठी करतात. तुम्ही याचा वापर हातांवरील मेहंदी सुद्धा कमी करण्यासाठी करु शकता. टूथपेस्टचा वापर करताना आधी हातांवर थोडी टूथपेस्ट घ्या आणि पाण्याचे दोन किंवा चार थेंब घेऊन संपूर्ण हातांवर चोळून घ्या. असे केल्याने देखील हातांवरील मेहंदी कमी होते.

गरम पाणी आणि ओले कापड

हातांवरून निघत असलेली मेहंदी पूर्णता गायब व्हावी आणि हात स्वच्छ व्हावेत यासाठी तुम्ही आधी एक ग्लास गरम पाणी घ्या. पाण्याला आपल्याला सहज स्पर्श करता येईल इतकेच गरम करून घ्यावे. पाण्याने हात भिजवून घ्या आणि त्याच पाण्यात एक कापड देखील ओले करून घ्या. हे कापड आपल्या हातांवर किमान आर्धा तास तरी ठेवा. त्यानंतर मेहंदी पटपट हातांवरून निघून जाईल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याला चकाकी! सोन्याच्या दरात ३०००० रुपयांची वाढ, आजचे 18K- 22K आणि 24K चे दर किती?

Face Care: सतत चष्मा लावल्याने नाकावर पडलेले डाग कसे घालवायचे ? जाणून घ्या घरगुती सोपे उपाय

Maharashtra News Live Update: परभणीत भाजपचे काँग्रेसविरोधात आंदोलन

Kids Care In Monsoon : पावसाळ्यात १ वर्षांखालील बाळाची काळजी कशी घ्यावी? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Monsoon Rain Update : राज्यात किती टक्के पाऊस पडणार? IMD च्या अंदाजाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

SCROLL FOR NEXT