Sakshi Sunil Jadhav
पावसाळ्यात लहान बाळांची खूप काळजी घेतली पाहिजे. कारण या दिवसांमध्ये वातावरणात खूप बदल होतो.
बाळ लहान असल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. शिवाय त्याची त्वचाही फार नाजूक असते.
पुढील माहितीत आपण पावसाळ्यात लहान मुलांची कशी काळजी घ्यायची? याबद्दल जाणून घेणार आहोत.
लहान मुलांना पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन (Fungal Infection) होऊ शकतं. त्यामुळे त्याच्या शरीराला हात स्वच्छ केल्याशिवाय हात लावू नका.
पावसाळ्यात गारवा वाटतो. त्यामुळे बाळाला दमट खोलीत ठेवा. पावसाळ्यात बाळाला कपड्यात बांधत असाल कर त्याचे केस ओले असणार नाहीत याची काळजी घ्या.
बाळ रडायला लागलं की त्याला स्तनपान करा. याने बाळाचं संसर्गापासून संरक्षण होतं. घरातल्या खिडक्या, दारं बंद ठेवा. त्याने डास घरात येणार नाहीत. तसेच बाळाचे संरक्षण होईल.
बाळाला पावसाळ्यात जाड कपडे घाला. उन्हात पूर्णपणे वाळलेले कपडेच त्यांना घाला.
पावसाळ्यात लहान मुलं सतत लघवी करत असतात. त्यामुळे त्यांचे डायपर वेळोवेळी बदलत राहा.