हल्ली नवनवीन फॅशन ट्रेंड येत आहेत. अशातच स्लिवलेस ड्रेस हे अनेकांना घालायला आवडतात. दिवाळी सारख्या सणांमध्ये स्लिवलेस ब्लाउज आणि ड्रेस घालण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु, काळवडलेल्या अंडरआर्ममुळे आपल्याला लाज वाटू लागते.
अशावेळी हे काळे अंडरआर्म आपल्या लाजेचे कारण बनतात. अंडरआर्म काळे होण्यामागे अनेक कारणे आहेत. बरेचदा आपण यासाठी रेझरचा वापर करतो ज्यामुळे ते अधिकच काळे होतात. पार्लरमध्ये ब्लीचिंग आणि वॅक्सिंग करुन आपल्याला काळवडलेल्या अंडरआर्मपासून सुटका मिळू शकते. परंतु काही घरगुती उपचार केल्यास काळ्या डागांपासून आपली सुटका होऊ शकते. जाणून घेऊया त्याबद्दल ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. हळद आणि लिंबाची पेस्ट
हळद आणि लिंबाची (Lemon) पेस्ट एकत्र करुन घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट अंडरआर्मवर अर्धातास लावा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. हळद आणि लिंबात असणारे घटक त्वजा उजळवण्यास मदत करतात. तसेच घामामुळे साचलेली घाण आणि दुर्गंधी निघण्यास मदत होते.
2. बटाट्याचा रस
बटाट्यामध्ये त्वचा उजळण्याचे गुणधर्म आहेत. ज्याचा वापर करुन अंडरआर्मचा काळपटपणा दूर करता येतो. यासाठी बटाटा (Potato) किसून पिळून त्याचा रस काढा. हा रस हाताच्या किंवा कापसाच्या मदतीने अंडरआर्म्सवर लावा. १० मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
3. लिंबाचा वापर
लिंबात व्हिटॅमिन (Vitamin) सी असते ज्यामुळे काळपटलेली त्वचा गोरी होण्यास मदत होते. याच्या नियमित वापराने काही दिवसात फरक जाणवेल. लिंबाचा छोटा तुकडा अंडरआर्म्सवर चोळा. १० मिनिटानंतर पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर मॉइश्चरायझर लावा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.