besan face pack yandex
लाईफस्टाईल

Beauty Tips: दिवाळीच्या दिवसांत चेहऱ्यावर चमक हवीये? तर 'हे' अप्रितम फेस पॅक नक्की ट्राय करा

Beauty Tips: सणासुदीच्या दिवसामध्ये सुंदर दिसावं असं प्रत्येक स्त्रिला वाटत असतं. या दरम्यान स्त्रिया सुंदर त्वचेसाठी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतात. म्हणून स्त्रियानां आम्ही काही घरगुती फेस पॅक बद्दल सांगणार आहोत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक स्त्रीला आपण सुंदर दिसावं अशी खूप इच्छा असते. या दरम्यान स्त्रिया स्वत:च्या त्वचेची खूप काळजी देखील घेतात. याबरोबर आता दिवाळी सण मोठ्या थाटामाटत सुरु झाला आहे. दिवाळीमध्ये महिला फराळ बनवण्यात रमलेल्या आहेत. यामुळे स्त्रियांना स्वत:च्या त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. पण सणासुदीच्या दिवसामध्ये सुंदर दिसावं असं प्रत्येक स्त्रिला वाटत असतं. स्त्रिया नेहमीच सुंदर सौंदर्यसाठी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत असतात. पण आता स्त्रियांना सुंदर त्वचेसाठी पार्लरला जाण्याची गरज नाहीये. त्या आता घरीच त्यांच्या चेहऱ्यावर अप्रतिम चमक आणि सुंदर ग्लो आणू शकता. अशाच स्त्रियांना आम्ही काही घरगुती पद्धतीने तयार होणाऱ्या फेस पॅक बद्दल सांगणार आहोत.

घरात असणारे बेसन पीठ फक्त जेवणापुरतेच मर्यादित नाहीये. बेसनाच्या पीठाचा वापर आपण आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी करु शकतो. आरोग्यदायी बेसन पीठ आपल्या त्वचेतील तेलकटपणा दूर करण्याचे काम करतो. त्याबरोबर आपल्या त्वचेचा रंग सुधारतो, त्वचा हायड्रेट ठेवण्यास देखील मदत करत असतो. बेसन पीठात अनेक गुणधर्म असल्याने ते आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्याचे काम करत असतात. जर तुम्हाला सुद्धा चेहऱ्यावर चमक हवीये, तर या गोष्टी बेसन पीठामध्ये मिसळून लावा.

बेसन आणि दही

बेसन आणि दहीचा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने तुमची त्वचा चमकदार आणि सॅाफ्ट होते. बेसन आणि दहीचा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला २ चमचे बेसन आणि १ चमचा दही, लिंबूचा रस लागेल. हे सर्व घटक मिक्स करुन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे ठेवा आणि यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

बेसन आणि हळद

बेसन आणि हळदीचा फेस पॅक लावल्याने तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला २ चमचे बेसन पीठात थोडीशी हळद आणि पाणी मिक्स करुन चेहऱ्यावर लावायचे आहे. यामुळे त्वचेची जळजळ आणि डाग कमी होईल.

बेसन आणि गुलाबपाणी

बेसन आणि गुलाबपाणी त्वचेला हायड्रेट आणि ताजेतवाणे ठेवण्यास मदत करतात. हा फेस पॅक तयार करण्यासाठी २ चमचे बेसन घ्या आणि त्यात आवश्यकतेनुसार गुलाबजल अॅड करुन ती पेस्ट लावा. यानंतर १५ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

बेसन आणि खोबरेल तेल

बेसन आणि खोबरेल तेलाचा फेस पॅक त्वचेला मॅाइश्चरायझ करण्याचे काम करतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला २ चमचे बेसनात १ चमचे खोबरेल तेल अॅड करुन पेस्ट चेहऱ्यावर लावायची आहे. हे लावून झाल्यावर १० मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT