Beauty Skin Tips Saam TV
लाईफस्टाईल

Beauty Skin Tips : चेहऱ्यावरील तेज मोत्यासारखं चमकवेल हा हर्बल चहा; एक घोट घेताच दिसेल जादू

Ruchika Jadhav

मी दिवसेंदिवस सुंदर दिसावं. माझ्या चेहऱ्यावरील तेज कधीच कमी होऊ नये असं प्रत्येक मुलीला वाटत असतं. सुंदर दिसण्यासाठी मुली सतत महागडे ब्युटी प्रोडक्ट्स देखील चेहऱ्यावर अप्लाय करतात. मात्र असे ब्युटी प्रोडक्ट्स आपल्या खिशाला कात्री लावतात. अशात जर तुम्हाला फक्त एक कप चहा पिऊन महागड्या क्रिमसारखा ग्लो मिळणार असेल तर?

प्रत्येक तरुणीला हे फार आवडेल. त्यामुळे आज आम्हीच तुमच्यासाठी एक रामबाण हर्बल टी आणली आहे. याचे सेवन केल्याने तुमची त्वचा अगदी कोमल आणि मुलायम होईल. शिवाय तुमच्या चेहऱ्यावर एकही डाग पिंपल्स दिसणार नाहीत. याने तुमचे जास्तीचे पैसे तर वाचतीलच शिवाय त्वचेला कोणत्याही प्रकारे हाणी पोहचणार नाही.

त्वचेसाठी गुणाकारी हर्बल टी

तुम्ही हर्बल टी घ्या किंवा मग दालचिनी आणि हळदीचा चहा, या प्रकारचे पेय आपल्या आरोग्यासह त्वचेसाठी कायम चांगले ठरले आहेत. आम्ही तुम्हाला आज ज्या चहाची रेसिपी सांगणार आहोत त्यात त्वचेला थंड वाटावे म्हणून देखील विविध गोष्टी अॅड करण्यात आल्या आहेत.

साहित्य

पानी - २ कप

पुदिन्याची पाने - १ वाटी

लवंग - २

दालचिनी - २

बडिशेप - १ चमचा

दालचिनी पावडर - २ चिमुट

कृती

हा हर्बल चहा बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात २ कप पाणी ओतून घ्या. पाणी थोडं गरम झालं की त्यात लवंग, दालचिनी, दालचिनी पावडर, बडिशेप आणि पुदिन्याची पाने टाकून घ्या. या पाण्याला मस्त उकळी येऊ द्या. पाण्याला छान उकळी आली की पुढे हे पाणी असेच उकळत राहुद्या.

पाणी मस्त उकळलं की पुढे हे पाणी गाळणीने गाळून घ्या. तयार चहा गाळून झाला की तो तुम्ही पिऊ शकता. या चहाची चव अगदी मस्त लागते. तसेच सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने आपलं आरोग्य सुधारतं आणि त्वचेवर देखील सुंदर ग्लो येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : पोस्ट खात्यातील पैसे संपले; लाडक्या बहिणींना पहावी लागतेय वाट

Chanakya Niti: वयाच्या २० वर्षांनंतर 'या' चुका करूच नका; नाहीतर वाईट काळ सुरु झाला असं समजा

Pooja Khedkar : पूजा खेडकरचे वडील विधानसभा लढवणार, विखेंवर टीका करत घोषणा

Kacha Chivda: विदर्भ स्पेशल कच्चा चिवडा कसा बनवायचा?

Pune Accident: भरधाव रिक्षा कठड्याला धडकली, भीषण अपघातात माय- लेकाचा करुण अंत; मन सुन्न करणारी घटना

SCROLL FOR NEXT