Lipstick Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Lipstick Side Effects : ओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठी रोज लिपस्टिक वापरताय? मग होणारे नुकसानही जाणून घ्या

5 Side Effects Wearing Lipstick : हल्ली सगळ्याच मुली परफेक्ट लूकसाठी लिपस्टिकचा वापर करतात.

कोमल दामुद्रे

Harmful Effects Of Wearing Lipsticks : सुंदर दिसण्यासाठी आपण जितकी शरीराची काळजी घेतो तितकीच चेहऱ्याची सुद्धा घेतो. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्टसचा वापर करतो. आपला चेहरा अधिक सुंदर दिसावा असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी आपण सतत काही ना काही वापर असतो.

चेहऱ्याचे सौंदर्य हे ओठांवर अवलंबून असते. हल्ली सगळ्याच मुली परफेक्ट लूकसाठी लिपस्टिकचा वापर करतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का याच्या अतिवापरामुळे तुमच्या ओठांचे नुकसान होऊ शकते.

कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या अभ्यासानुसार, बहुतेक लिप ग्लॉस आणि लिपस्टिकमध्ये क्रोमियम, शिसे, अॅल्युमिनियम, कॅडमियम सारखी रसायने असतात. यामुळे त्याचा सतत वापर केल्यास ओठांचे नुकसान होऊ शकते. जाणून घेऊया लिपस्टिक लावल्यामुळे काय नुकसान होते ते.

1. ओठांचा कोरडपणा

लिपस्टिकमध्ये (Lipstick) अनेकप्रकारे रंग व सुंगध वापरले जातात. ज्यामुळे ओठ कोरडे होतात. यामुळे ओठांना योग्यप्रकारे मॉइश्चरायझेशन मिळत नाही. त्यामुळे ओठ (Lips) कोरडे होतात व फाटतात.

2. ऍलर्जी

बऱ्याच लोकांना लिपस्टिकमध्ये असणाऱ्या रंगामुळे व सुंगधामुळे ओठांवर ऍलर्जी होण्याची शक्यता असते. या ऍलर्जीमध्ये ओठ अधिक काळवंडतात किंवा सूजतात. यामुळे ओठांना खाजही येऊ शकते.

3. ओठांचा नैसर्गिक रंग कमी होणे

लिपस्टिकमुळे ओठांचा नैसर्गिक रंग कमी होतो. ज्यामुळे आपले ओठ अधिक काळे होतात ज्यामुळे ओठ काळे पडतात व चेहऱ्याचे सौंदर्य कमी होऊ लागते.

4. शरीराला नुकसान

काही लिपस्टिकमध्ये असे घटक असतात ज्यामुळे आरोग्याला (Health) हानी होऊ शकते. याच्या वापरामुळे यात असणारे घटक थेट आपल्या ओठातून पोटात जातात. ज्यामुळे शरीराला नुकसान होऊ शकते.

5. मेंदूला हानिकारक

लिपस्टिकचा सतत वापर केल्याने आपल्या मेंदूच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. त्यात असलेले शिसे नावाचे रसायन न्यूरल इजा होऊ शकते. एवढेच नाही तर शिशामुळे स्मरणशक्ती कमकुवत होते. नर्व्ह ट्रान्समिशनवर परिणाम होणे आणि एकाग्रता कमी होणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malegaon : मालेगावात पुन्हा शिक्षक भरती घोटाळा; २ कोटी ६९ लाखात फसवणूक केल्याचे उघड, पाच जणांवर गुन्हा दाखल

Khodala Waterfall: मुंबईपासून जवळ असलेल्या धबधब्यावर भिजायचा प्लान करताय? 'हा' स्पॉट ठरेल परफेक्ट डेस्टिनेशन

मला xxx काढता का? तुमचा माज...; अजित दादांच्या आमदाराची जीभ घसरली, नेमकं घडलं काय?

Maharashtra Politics: ...यापुढे एकही चूक खपवून घेणार नाही, CM फडणवीसांनी मंत्र्यांना दिली तंबी

Prajakta Mali: 'एक नंबर तुझी कंबर...' प्राजक्ताच्या फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा

SCROLL FOR NEXT