Benefits of pulses, healthy food
Benefits of pulses, healthy food ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

या डाळींचा आपल्या आहारात अवश्य समावेश करा !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : निरोगी जीवनशैलीसाठी आहाराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु, आपल्यातील काही लोक जंक फूड (Food) आणि तेलकट पदार्थांचा आहारात कमी वापर करतात.

हे देखील पहा-

बहुतेक लोक निरोगी राहण्यासाठी हलके अन्न खाण्यावर विश्वास ठेवतात. बऱ्याचदा आपण आहार चुकीचा घेतो. योग्य आहारात कोणता ? त्यामुळे आपल्या शरीराला होणारे फायदे व नुकसान कोणते ? कोणत्या डाळींचा आहारात समावेश करावा. ज्यामुळे पचनक्रिया पूर्णपणे सुरळीत राहील व गॅस आणि अँसिडिटीचा त्रास होणार नाही. या डाळींच्या सेवनाने आपले शरीर थंड राहून उष्णतेपासून आराम मिळू शकतो. (Pulse benefits )

या डाळींचा आहारात समावेश करा-

१. मूग डाळ पचण्यास अतिशय हलकी आणि थंड (Cold) असते. तिच्यात पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, तांबे, मॅग्नेशियम आणि फायबर अधिक प्रमाणात आढळून येते. त्यात जीवनसत्त्वे ए, बी, सी आणि ई प्रामुख्याने आहेत. आपण मूग डाळीचा आहारात समावेश केल्यास शरीरातील पौष्टिकतेची कमतरता भरुन निघेल तसेच, उष्णतेपासूनही बऱ्याच अंशी आराम मिळेल.

२. उन्हाळ्यात उडीद डाळीचे सेवन केल्यास पोटासाठी फायदेशीर ठरते. उडीद डाळीचे सेवन केल्यास पोट थंड राहते आणि पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते. इतर डाळींप्रमाणेच उडीद डाळीतही प्रथिने, जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. उडीद डाळीचे सेवन देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते.

३. बऱ्याच जणांना असे वाटते चणा डाळ ही पचण्यास जड आहे परंतु, चणा डाळ ही पचण्यास हलकी असून शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यास आणि एनर्जी लेव्हल राखण्यास मदत करते. तसेच, आपण आहाराचा भाग म्हणून चणा डाळीचे सेवन विविध पध्दतीने करतात. चण्याच्या डाळीपासून बनवलेले सत्तू पोट थंड ठेवून उष्णतेपासून मुक्त होण्यास मदत करते.

या डाळींचा आहारात समावेश केल्यास आरोग्याला फायदा होऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Uddhav Thackeray: मोदींचं PM पदासाठी नाव सुचवलं हे माझं पाप, उद्धव ठाकरे यांनी भरसभेत व्यक्त केली खंत

Mumbai Local : तीन प्रवाशांच्या मृत्यूनंतर मध्य रेल्वेला आली जाग; लोकलच्या गर्दी नियंत्रणासाठी घेतला मोठा निर्णय

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT