Liver cirrhosis symptoms at night saam tv
लाईफस्टाईल

Liver cirrhosis symptoms at night : रात्री झोपताना शरीरात 5 लक्षणं दिसली तर सावध व्हा; लिव्हर सिरोसिस असण्याचा धोका

Early signs of liver cirrhosis while sleeping : लिव्हर सिरोसिस हा एक गंभीर यकृताचा आजार आहे. ज्यामध्ये यकृताच्या पेशींचं कायमस्वरूपी नुकसान होतं. यामुळे यकृताची कार्यक्षमता हळूहळू कमी होते आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास ते प्राणघातक ठरू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

लिव्हर सिरोसिस ही एक यकृताची गंभीर परिस्थिती मानली जाते. या गंभीर परिस्थितीमध्ये लिव्हरच्या पेशींचं कायमचं नुकसान होण्याचा धोका असतो. यामध्ये तुम्हाला माहिती आहे का की, रात्री झोपताना लिव्हर सिरोसिसची काही लक्षणं दिसून येतात. जर तुम्हालाही अशी लक्षणं दिसत असतील तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जर लिव्हर सिरोसिसची ही लक्षणं आपण वेळेत ओळखली तर त्यावर उपचार करणं सोपं जातं. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास लिव्हर ट्रान्सप्लांट म्हणजेच यकृत प्रत्यारोपणाची वेळ येऊ शकते. त्यामुळे ही लक्षणं नेमकी काय आहे ते पाहूयात.

पोटात जड वाटणं

रात्री झोपताना जर तुम्हाला पोटात जडपणा, सूज किंवा वेदना जाणवत असतील तर ते हलक्यात घेऊ नका. याचं कारण म्हणजे हे लिव्हर सिरोसिसमुळे पोटात द्रव जमा होण्याचं लक्षण असू शकतं. सिरोसिसमध्ये यकृत योग्यरित्या काम करत नाही. ज्यामुळे पोर्टल हायपरटेन्शन होतं.

थकवा

रात्री झोपल्यानंतरही जर तुम्हाला जास्त थकवा, अशक्तपणा किंवा सुस्ती जाणवत असेल, तर हे सामान्य मानलं जात नाही. ज्यावेळी यकृत शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकू शकत नाही, तेव्हा थकवा जास्त जाणवतो.

त्वचेवरील पिवळेपणा

जर तुमच्या त्वचेवरील पिवळेपणा वाढत असेल आणि नखं देखील पिवळी दिसत असतील तर सावध व्हा. यावेळी डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसू लागला असेल, तर समजून घ्या की लिव्हर सिरोसिसचा धोका वाढतोय. जेव्हा सिरोसिसमध्ये बिलीरुबिनची पातळी वाढते तेव्हा कावीळ होऊ लागते.

श्वास घेण्यास त्रास

जर तुम्हाला बेडवर झोपल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा जडपणा वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही परिस्थिती पोटात द्रव जमा झाल्यामुळे किंवा फुफ्फुसांमध्ये दाब पडल्याने होऊ शकते.

रक्ताची उलटी

रात्री रक्ताच्या उलट्या होणं किंवा मल काळा होणं हे देखील यकृताच्या सिरोसिसचं लक्षण मानलं जातं. सिरोसिसमध्ये पोर्टल हायपरटेन्शनमुळे एसोफेजियल व्हेरिसेस म्हणजेच शिरांना सूज येते. ज्यामुळे त्या फुटल्यावर रक्तस्त्राव होतो. ही एक अतिशय धोकादायक स्थिती मानली जाते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: 12वी फेल, २ वर्षे दूध विकले, मोठ्या जिद्दीने केली UPSC क्रॅक; नाशिकच्या लेकाची यशोगाथा

Asim Munir : ट्रम्पच्या कुबड्यांवर मुनीरच्या बेडूक उड्या;पाकचा हिटलर अमेरिकेत बरळला, VIDEO

Tuesday Horoscope : ५ राशींच्या लोकांवर गणरायाची कृपा होणार; धन, सुख,समृद्धीचा वर्षाव होणार, वाचा मंगळवारचं राशीभविष्य

Manoj Jarange : मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट? मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, VIDEO

Pune: जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रमी खेळताना भाजप पदाधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT