Jamun Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Jamun Side Effects : जांभूळ खाताय तर सावधान ! या चुकामुळे आरोग्यावर होईल परिणाम

Side Effects : जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Side Effects Of Jamun : जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. पोटदुखी, मधुमेह, आमांश, संधीवात आणि इतर अनेक पचन समस्या बरे करण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. पण अनेक वेळा असे घडते की आपण जांभूळ खाण्याच्या पद्धतींकडे जास्त लक्ष देत नाही. ज्यामुळे आपण आजारी पडतो किंवा आरोग्याशी संबंधीत अनेक समस्या उद्भवतात. चला जाणून घेऊया जांभुळ खाताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

रिकाम्या पोटी जांभुळ खाणे टाळा -

रिकाम्या पोटी जांभुळ खाणे आरोग्यासाठी (Health) हानिकारक आहे आणि यामुळे तुमच्यासाठी अनेक समस्या उद्भवू शकतात. जांभुळची चव आंबट असते, त्यामुळे रिकाम्या पोटी जांभुळ खाल्ल्याने एसिडीटी, पोटदुखी, पोटात जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

जांभुळ आणि हळद एकत्र कधीही खाऊ नका -

जांभुळ खाल्ल्यानंतर लगेच हळदयुक्त पदार्थ (Food) खाल्ल्याने पोटात जळजळ होऊ शकते. जर तुम्हाला जांभुळ खाल्ल्यानंतर हळद खाण्याची इच्छा असेल तर किमान 30 मिनिटे थांबा. वास्तविक, जांभुळ आणि हळद एकत्र मिसळल्याने शरीरात प्रतिक्रिया होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला बराच काळ अस्वस्थ वाटेल. तसेच यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

दूध आणि जांभुळ एकत्र खाल्ल्याने गॅस होतो -

दूध आणि जांभुळ एकत्र सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. हे फळ (Fruit) खाल्ल्यानंतर लगेच दूध प्यायल्याने गॅस, पोटदुखी यांसारख्या पचनाच्या समस्या होऊ शकतात. जांभुळ खाल्ल्यानंतर लगेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून दूर रहा आणि किमान 30 मिनिटांनंतरच दूध प्या.

लोणचे आणि जांभुळ एकत्र खाऊ नका -

घरी बनवलेले आंबट-गोड लोणचे खायला कोणाला आवडत नाही. पण इथे काही फूड कॉम्बिनेशनसोबत लोणचे खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. या दोन गोष्टींच्या मिश्रणाने पोटाचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत जांभुळ खाल्ल्यानंतर एक तास लोणचे टाळले तर बरे होईल.

जांभुळ खाल्ल्यानंतर कधीही पाणी पिऊ नका -

जांभुळ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे कारण जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे हे अनेक समस्यांवर मेजवानीसारखे आहे. त्यामुळे डायरियासारखा आजार तुम्हाला घेरतो. येथे जांभुळ खाल्ल्यानंतर 30 ते 40 मिनिटांनंतरच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Farmer : सरकारने जमा केलेली रक्कम शेतकऱ्यांने केली परत; अतिवृष्टीची तुटपुंजी मदत दिल्याने शेतकरी संतप्त

Amruta Khanvilkar Tattoo: अभिनेत्री अमृता खानविलकरच्या हातावर गोंदवलेला खास टॅटू कोणत्या व्यक्तीचा आहे?

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समित्यांच्या सभापदी पदाचे आरक्षण जाहीर

Accident News : फुटबॉलपटूचा भीषण अपघात; दुखापतीमुळे शस्त्रक्रिया, १० महिने चालता येणार नाही

Pawan Singh: पिल्स खायला दिल्या, अबॉर्शन करायला भाग पाडलं अन्...; प्रसिद्ध अभिनेत्यावर पत्नीचे धक्कादायक आरोप

SCROLL FOR NEXT