Bank Holidays Saam Tv
लाईफस्टाईल

मे महिन्यात 'या' दिवशी बँका राहणार बंद! ही आहे सुट्ट्यांची यादी

एप्रिल महिना लवकरच संपणार असून, मे महिन्यातील बँकांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बँकेने (RBI) अगोदरच जाहीर केल्या

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: एप्रिल महिना लवकरच संपणार असून, मे महिन्यातील बँकांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बँकेने (RBI) अगोदरच जाहीर केल्या आहेत. मे महिन्यामध्ये बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही सलग सुट्ट्या घेण्याची संधी मिळणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला ४ दिवस (bank closed) बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुमचे बँकेशी संबंधित कोणते महत्त्वाचे काम असेल तर ते त्वरित पूर्ण करा. कारण ४ दिवस सुट्टी असल्यास (bank holiday) तुमचे काम शिल्लक राहू शकते. मात्र, सुट्टीच्या काळात (online banking) ऑनलाईन बँकिंगच्या सर्व सुविधा उपलब्ध असून त्याचा ग्राहकांना वापर करता येणार आहेत.

हे देखील पाहा-

मे महिन्यातील सुट्या

२ मे सोमवारी, रमजान- ईदची सुट्टी

३ मे मंगळवारी, भगवान श्री परशुराम जयंती/रमजान/ईद/बसव जंयती/ अक्षय तृतीया बद्दल सुट्टी

९ मे सोमवारी, गुरुदेव रवींद्रनाथ टॅगोर यांचा जन्मदिवस

१६ मे सोमवारी, बुद्ध पोर्णिमा

या ४ दिवशी मे महिन्यांत बँकेचे कामकाज होणार नाही. या ४ दिवसांव्यतिरिक्त शनिवार- रविवारी पण बँका बंद असतात. रिझर्व्ह बँकेच्या कॅलेंडरनुसार, दर महिन्यात रविवारी तर सुट्टी असतेच. पण त्याबरोबरच दुस-या आणि चौथ्या शनिवारी ही बँकांना बोनस सुट्टी असते. जर या सर्व सुटया एकत्रित केल्या तर मे महिन्यांत एकूण ११ सुट्या असणार आहेत. यामुळे या सुट्या लक्षात घेत बँकेतील महत्वाची कामे त्वरीत उरकून घेणे तुमच्या फायद्याचे ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT