साडी(Saree), ही असी गोष्ट आहे जी प्रत्येक स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मग ती पैठणी (Paithani) असो, कांजीवरम (Kanjiwaram) असो की, बनारसी स्त्रीला साडी ही अत्यंत प्रिय असते. मात्र स्त्रीयांना आपल्याकडे किमान एक तरी बनारसी साडी असावी अशी इच्छा असते. पण बनारसी साड्यांच्या किमती पाहता, अनेकदा स्त्रीया त्या घेऊ शकत नाहीत. पण असे नक्की काय असते या बनारसी साडीत. (Banarasi Saree: What exactly is in these sarees worth lakhs?)
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हातमाग कामगारांनी साड्यांवर सोन्याच्या धाग्यांनी अशा डिझाईन्स बनवल्या जातात ज्यामुळे त्या साड्यांना थ्रीडी लुक मिळतो. ब्रोकेडचा वापर मुख्यतः बनारसी साड्यांवर दिसतो. ब्रोकेडपासून बनवलेल्या साड्या आणि इतर कपडे खूप महाग आहेत. क्वचितच तुम्हाला माहिती असेल की ब्रोकेड (Brocade) पासून बनवलेल्या साडीची किंमत 3 लाखांपर्यंत असू शकते. पण हे ब्रोकेड (Brocade) काय आहे आणि त्यापासून बनवलेल्या साड्या इतक्या महाग का आहेत. याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
सोने आणि चांदीची नक्षी
ब्रोकेड हे खरं तर कापड आहे ज्यावर सोने किंवा चांदीच्या धाग्यांनी भरतकाम केले जाते. हे एकेकाळी राजा-महाराजांसाठी आणि फक्त राजघराण्यातील सदस्यांसाठी बनवले जात असे. पण आता ब्रोकेड सर्व ठिकाणी अगदी सहजपणे मिळते. आता अनेकदा भरतकाम केलेल्या कापडावर अधीच डिजाईन केलेली असते आणि धाग्यांनी त्या कापडावर भरतकाम केले जाते. मात्र तिथे ब्रोकेडला डिझाईन नसते त्यावर थेट नक्षीकाम केले जाते. जुन्या काळात रेशीमवर ब्रोकेडचे काम अनेकदा केले जात असे. पण आता जसा काळ बदलला आणि तंत्रज्ञान प्रगत झाले, तसे लोकर आणि सूती कापड, अगदी कृत्रिम कापडांवरही ब्रोकेडचे काम केले जाऊ लागले. ब्रोकेडमध्ये एकाचवेळी 100 ते 600 धागे वापरले जातात.
चीनमधून आले ब्रोकेड
ब्रोकेडचा इतिहास प्रथम चीनमध्ये आढळतो, जिथे इसवी सन पुर्व 475 ते 221 पर्यंत ब्रोकेड वापरला जात असे. त्यानंतर हे ब्रोकेड युरोप आणि आशियातील देशांमधून आले. आता जगातील प्रत्येक देशात त्याचा प्रचंड वापर केला जात आहे. बनारसमध्ये बनवलेली ब्रोकेड साडी सिल्क फॅब्रिकपासून बनवली जाते. या साडीवर झरी वापरून डिझाईन्स बनवल्या जातात. यामुळे साडीचे वजन वाढते. या साड्यांमध्ये मुघल काळापासून प्रेरित डिझाइन्स बनवल्या जातात. याशिवाय सोन्याचे काम केले जाते आणि त्यावर जाळीसारखा नमुना तयार केला जातो. बनारसमध्ये साडीचे काम पारंपारिक पद्धतीने केले जाते ज्याला पगिया आणि नाका या नावाने ओळखले जाते.
बनारसी साडी कधीपासून वापरली जाते
बनारसी साड्यांमध्ये ब्रोकेड आणि झरीचा पहिला उल्लेख १९व्या शतकापासून आढळतो. त्यावेळी गुजरातमधील रेशीम विणकर उपासमारीमुळे बनारसमध्ये स्थायिक झाले होते. रेशीम ब्रोकेडचे काम 17 व्या शतकात येथून सुरू झाल्याचे सांगितले जाते. 18 व्या आणि 19 व्या शतकात ते अधिक चांगले झाले. मुघल काळात, म्हणजे 14 व्या शतकाच्या आसपास,ब्रोकेड विणण्यासाठी सोन्या -चांदीच्या धाग्यांना प्राधान्य दिले जात असे. हळूहळू हे धागे बनारस आणि बनारसी रेशीमची ओळख बनले. ब्रोकेडमुळे बनारसी साडीची किंमत 3 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 5 लाख रुपयांपर्यंत जाते. याशिवाय दक्षिण भारतात बनवलेल्या कांजीवरम साड्यांमध्येही ब्रोकेडचे काम केले जाते. या साड्याही खूप महाग आहेत.
यूपीचे अनेक कारागीर ब्रोकेडमध्ये गुंतले
पारंपारिक बनारसी साडीवरील ब्रोकेडचे काम आता उत्तर प्रदेशात कुटीर उद्योग म्हणून स्थापित झाले आहे. बनारसी साड्यांवर सुमारे 1.2 दशलक्ष लोक ब्रोकेडच्या कामात गुंतलेले आहेत. बनारसी साड्यांवरील ब्रोकेड कामामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. हे लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे या उद्योगाशी संबंधित आहेत आणि हातमाग रेशीम उद्योगाचा भाग आहेत. बनारसी साड्या आणि ब्रोकेडचे काम उत्तर प्रदेशातील वाराणसी, मिर्झापूर, गोरखपूर, चंदौली, जौनपूर आणि आझमगड या 6 जिल्ह्यांमध्ये स्थायिक झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बनारसी साड्या आणि ब्रोकेड्सची कला जिवंत करण्याच्या प्रयत्नात वाराणसीतील काही ब्रॅण्ड समोर आले आहेत. हे ब्रँड विणकरांच्या तयार साड्या थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत.
Edited By- Anuradha
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.