Seekh Kebab Recipe Saam Tv
लाईफस्टाईल

Seekh Kebab Recipe : यंदाच्या बकरी ईदला ट्राय करा कश्मीरी स्टाइल सीख कबाब, पाहा रेसिपी

How To Make Seekh Kebab : रविवारी किंवा इतर दिवशी तुम्ही हे कश्मीरी स्टाइल सीख कबाब नक्की ट्राय करु शकता.

कोमल दामुद्रे

Bakari Eid Special Recipe : बकरी ईदला अनेक प्रकारचे नॉन व्हेज पदार्थ बनवले जातात व त्याची चव पाहुण्यांना देखील चाखवली जाते. यंदा बकरी ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी असल्यामुळे नॉन व्हेज प्रेमीना टेन्शन आले असेल परंतु, चिंता कशाला करताय ?

रविवारी किंवा इतर दिवशी तुम्ही हे कश्मीरी स्टाइल सीख कबाब नक्की ट्राय करु शकता. या सिख कबाबला काश्मिरी वाझवान म्हणूनही ओळखले जाते. बकरी ईदला या दिवशी मुस्लिम बांधवाच्या घरी गोडासोबतच तिखट पदार्थ देखील आवर्जून चाखले जातात. नुकताच पावसाळा सुरु झाल्यामुळे तुम्हालाही चमचमीत पदार्थ खायचा असेल तर ही रेसिपी नक्की बनवून पाहा.

1. साहित्य:

  • 1 किलो ताजे मटण

  • 1 टीस्पून लाल मिरची

  • 1 टीस्पून हळद (Turmeric)

  • 1 टीस्पून मीठ

  • 2 अंडी

  • 1 टीस्पून जिरे

2. कृती

  • सीख कबाब बनवताना नेहमी ताजे मांस वापरा. सर्वप्रथम मटण चांगले धुवा आणि नंतर त्याचे तुकडे करा.

  • काश्मीरमध्ये लाकडी काठीवर ठेऊन मोठ्या चाकूच्या साहाय्याने मांसाचे छोटे तुकडे केले जातात, पण तुमच्याकडे अशी सोय नसेल तर तुम्ही फूड प्रोसेसरची मदत घेऊ शकता.

  • मांसाचे छोटे तुकडे केल्यानंतर त्यात १ चमचा लाल तिखट आणि १ चमचा मीठ (Salt) घाला. नंतर तासभर झाकून ठेवा.

  • तासाभरानंतर त्यात १ चमचा हळद आणि १ चमचा जिरे घाला. यानंतर त्यात दोन अंडी (Egg) फोडा. यानंतर, ते चांगले फेटून घ्या ज्यामुळे सर्व मसाले चांगले एकजीव होतील. यानंतर मिश्रणाचे गोळे बनवा.

  • आता आपण मटणाचे गोळे स्क्रुवर ठेवायला सुरुवात करा. हात पाण्याने ओले करा आणि मटण स्क्रुवरच्या भोवती कबाबच्या आकारात ठेवा.

  • यानंतर, सर्व skewers जळत्या कोळशावर ठेवा आणि त्यांना एकामागून एक बेक करा.

  • तुमच्या घरी कोळसा नसेल तर तुम्ही गॅसच्या थेट आचेवर कबाब देखील शिजवू शकता. अशा प्रकारे सीख कबाब तयार होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT